Restrictions on Rana couples rall
Restrictions on Rana couples rall Restrictions on Rana couples rall
नागपूर

राणा दाम्पत्याच्या रॅलीवर निर्बंध; भोंग्याशिवाय हनुमानचालिसा पठण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील रामनगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात चालिसा पठणासाठी शनिवारी (ता. २८) दुपारी दीड वाजता राणा दाम्पत्य ३६ दिवसांनंतर परतणार मतदार संघात, २८ मे रोजी होणार अमरावतीत आगमन शहरात दाखल होणार आहे. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारची रॅली आणि भोंग्याचा वापर करण्यास शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहे. विशेष म्हणजे मंदिरात निवडक लोकांसोबतच चालिसा पठणाची परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. (Restrictions on Rana couples rally)

महिनाभरापासून हनुमान चालिसा पठणावर आमदार रवी राणा (ravi rana), खासदार नवनीत राणा (navneet rana) विरुद्ध शिवसेना (shivsena) असा संघर्ष चांगलाच शिगेला पोहचला आहे. यातून राणा दांपत्य ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम घेत आहे. त्यातून त्यांनी शनिवारी रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी पोलिस आयुक्तांकडे परवानगी मागितली. त्यांना पोलिस आयुक्तांकडून पठणासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, कुणालाही भोंग्याचा वापर करता येणार नाही. मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी परवानगीची गरज नाही, याशिवाय बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली आहे.

दरम्यान सुरवातीला राष्ट्रवादी पक्षातर्फे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यांनाही याच अटींवर पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यासाठी दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अगोदर दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी हनुमान चालिसा पठण करतील, त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अटी शर्थीचे उल्लंघन झाल्यास कारवाई

पोलिसांनी दोन्ही पक्षांना हनुमान चालिसा पठणासाठी बऱ्याच अटीशर्थी टाकल्या आहेत. यामध्ये मंदिरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी न करणे, मंदिरात निवडकांचा चालिसा पठणासाठी समावेश, कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य न करणे आदींचा समावेश आहे. या अटींचे पालन झाल्यास पोलिस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT