नरखेड ः विजयी जल्लोष करताना कॉंग्रेसचे कार्यकर्तेव उमेदवार. 
नागपूर

नरखेडमध्ये अठ्ठावीस वर्षांनंतर कॉंग्रेसचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्ष हद्दपार तर तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर कॉंग्रेसचे पुनरागमन झाले. तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती जागांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने निर्विवाद कब्जा मिळविला. भाजपचा गड असलेल्या बेलोना जिल्हा परिषद जागेवर पहिल्यांदा राष्ट्रवादीने विजय मिळविला तर जलालखेडा जिल्हा परिषद जागा कॉंग्रेसने हस्तगत केली. भाजप व शिवसेनेच्या वाट्याला भोपळा आला. 


जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव आहे. बेलोना गट हा अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष त्या जागेवर होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गटात सभा घेतली तरी स्थानिक पदाधिकारी ही जागा वाचविण्यास असमर्थ ठरले. गेली सात वर्षे नरखेड पंचायत समितीमध्ये शिवसेना व भाजपचे राज्य होते. तरी दोन्ही पक्ष पंचायत समितीची एकही जागा मिळवू शकले नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी भिष्णूर ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणुकीत पराभूत झालेले सतीश रेवतकर यांच्या पत्नी नीलिमा रेवतकर यावेळी निवडून आल्या. तसेच बंडू उमरकर याचे पुत्र मिथिलेश उमरकर यांनी आपल्या आईवडिलांच्या पराभवाचा वचपा मेंढला पंचायत समिती सर्कलमधून घेत विजय मिळविला. सावरगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळविणाऱ्या भाजपला येथून पराजयाचा सामना करावा लागला. त्यामुळे माजी आमदार सुनील शिंदे यांचे सावरगावातील वर्चस्व या निवडणुकीने सिद्ध केले. या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख व माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली. 

फडणवीसांना नाकारले ! 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, खुद्द त्यांच्या नागपूर जिल्ह्यात, भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर व विदर्भाच्या जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत उभे राहण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे. फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्य सरकार व जिल्हा परिषदेमध्ये भाजपने त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कारकीर्दीत जनतेच्या विरोधात अन्यायाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. बेरोजगारीचा डोंगर उभा केला. ही परिस्थिती पाहता पुनश्‍च एकदा नागपूर व विदर्भ कॉंग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. 
डॉ. आशीष देशमुख 
माजी आमदार, काटोल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं... आंदोलनकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात २० हून अधिक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2026

मोकळे व्हा : नात्यातील वागणूक आणि सवयी

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

SCROLL FOR NEXT