Revealed by Sudhir Mungantiwar on the visit of the Chief Minister Political news 
नागपूर

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असती तरी ती नागरिकांच्या हिताची असती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी परिवार संमेलनाच्या माध्यमातून ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशात विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी जाणार असल्याची चर्चा असतानाच भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे विविध चर्चेला सुरुवात झाली. या चर्चांवर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मी माझ्या जिल्ह्यातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चंद्रपूर विमानतळ, कृषी क्षेत्र, विजेच्या संदर्भात चर्चा झाली. या भेटीत सकारात्मक राजकीय चर्चा झाली असती तरी ती नागरिकांच्या हिताची असेल मग अडचण काय आहे?’ असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आपला पक्ष मजबूत करण्यासाठी ते दौऱ्यावर आले असताना त्यांना अनेकजण भेटत आहे. अशात राष्ट्रवादी मजबूत होणार, राष्ट्रवादीत भरती होणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली. अशात मुख्यमंत्र्यांची सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली. 

पराभवानंतर भाजपात अंतर्गद वाद आहे का? देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे दोन गट शहरात पडले आहे का? अशा चर्चांना शहरात सुरुवात झाली आहे. मुनगंटीवार फडणवीस गटाचे आहे. फडणवीसांवर पक्ष नाराज आहे का? असा प्रश्न असताना मुनगंटीवार यांच्या भेटीने अनेक चर्चांना सुरुवात झाली. आता त्यांनी उत्तर दिल्याने गैरसमज दूर होणार का, असाही प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT