जेवणातील आस्वाद वाढवणाऱ्या कोथिंबीर आणि मेथी, गवार शेंगांचे भाव प्रति किलो १०० रुपयावर गेले आहेत.
नागपूर : खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. बाहेरून भाज्यांची आवक सुरु झाल्याने इंधन दरवाढीमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहे. वांगे, टोमॅटो, पालक, दुधी भोपळा आणि पत्ताकोबीचे भाव सामान्यांच्या आवाक्यात आहेत. जेवणातील आस्वाद वाढवणाऱ्या कोथिंबीर आणि मेथी, गवार शेंगांचे भाव प्रति किलो १०० रुपयावर गेले आहेत. (rising fuel prices have pushed up vegetable prices)
पेट्रोल, डिझेल वाढल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरु झाले असले तरी अद्यापही हवी तशी मागणी सुरू झालेली नाही. तरीही इतर भाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी नवीन पीक घेण्यासाठी शेत खाली केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अतिशय अल्प प्रमाणात भाज्या येत असून आज बाजारात ५० ते ६० गाड्यांची आवक झाली. ती मागणीच्या तुलनेत ५० टक्के कमी आहे.
शहरात सध्या नाशिक, बंगलुरू आणि औरंगाबाद या परिसरातून भाज्या येऊ लागल्या आहेत. पुढील आठवड्यात इतर राज्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यातून भाजीची आवक सुरु झाल्यानंतर भावात किंचित घसरण होण्याची शक्यता आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, गवार शेंग, पडवळ, मेथीचे भाव आकाशाला भिडले आहेत, अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.
ठोक बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)
कोथिंबीर - ६० रुपये
गवार शेंग - ५० रुपये
मेथी - ७० रुपये
हिरवी मिरची - ४० रुपये
पडवळ - ५० रुपये
फणस - ५० रुपये
चवळी - ३० रुपये
वांगे - १५ रुपये
फुलकोबी - ४० रुपये
पानकोबी १५ रुपये
टोमॅटो - २० रुपये
भेंडी - ४० रुपये
शिमला मिरची - ५० रुपये
तोंडले - ३० रुपये
कारले - ३० रुपये
कोहळा - ३० रुपये
दुधी भोपळा - दहा रुपये
पालक - १० रुपये
पडवळ - ४० रुपये
मुळा - २० रुपये
ढेमस - ४० रुपये
गाजर - ४० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.