River cleaning programs in three places Preparation of administration after the order of the mayor 
नागपूर

कोरोनाने मरताहेत तर मरू दे, ‘इव्हेंट’ होणारच; तीन ठिकाणी नदी स्वच्छतेचे कार्यक्रम

राजेश प्रायकर

नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेची कामे प्रशासनाकडून केली जाते. काही वर्षांत लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान थाटात राबविण्याची परंपरा सुरू झाली. यंदा कोरोनाचे सावट असून दररोज ६० पेक्षा जास्त नागरिक कोरोनाबळी ठरत असतानाही हा थाट कायम असल्याचे प्रशासनाच्या तयारीवरून दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या आदेशावरून शहराच्या तिन्ही भागात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नदी स्वच्छता मोहिमेला थाटात सुरुवात केली जाणार आहे.

शहरातील नद्यांच्या स्वच्छतेबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ऑनलाइन बैठक पार पडली. प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ११ एप्रिलला तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ करण्याचे ठरले. महापौरांनी या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री, विरोधी पक्ष नेते, पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून हजर राहण्याची विनंती करण्याची सूचना प्रशासनाला केली.

शहरातील सर्व आमदार त्या भागातील नगरसेवकांनाही आमंत्रित करण्याची सूचना त्यांनी केली. यावरूनच नदी स्वच्छता मोहिमेच्या थाटाची अनुभूती आली. आता महापौरांनीच आदेश दिल्यानंतर प्रशासनही कामाला लागले. प्रशासनाने उद्या सकाळी साडेनऊ वाजता तीन वेगवेळ्या ठिकाणी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात करण्याचे निश्चित केल्याचे सूत्राने सांगितले.

अशोक चौकात नाग नदी स्वच्छता मोहिमेला उपमहापौर मनीषा धावडे यांच्या हस्ते, सहकारनगर घाटाजवळ पोरा नदी स्वच्छता मोहिमेला स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, नारा घाटाजवळ पिवळी नदी स्वच्छता अभियानाला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाने नागरिकांचा मृत्यू होत आहे.

बाधितांच्या दररोजच्या सहा हजारांपर्यंतच्या संख्येने सामान्य नागरिक भयभीत आहेत. बेड मिळत नसून रेमडिसिव्हिर औषधांचा तुटवडा असल्याने नागरिक तडफडत आहेत. घाटांवर पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी रांग लागत आहे. या विदारक व भयानक स्थितीत प्रशासन व सत्ताधाऱ्यांना एखादी मोहीम राबविण्याचे सुचतेच कसे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

मागील वर्षी प्रशासनाकडूनच स्वच्छता

मागील वर्षीही कोरोनाचा उद्रेक होता. त्यामुळे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कुठलाही गाजावाजा न करता शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता केली. कोरोनाचे व्यवस्थापन व नदी स्वच्छता या दोन्ही आघाड्यावर प्रशासनाने उत्कृष्ट काम केले. यंदाही प्रशासनाने तयारी केली. परंतु त्यात उत्सव शोधल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे.

महापौर व महापालिकाही उत्सवप्रिय बनली
भाजप, त्यांचे पदाधिकारी उत्सवप्रेमी आहेत. ते जनतेलाही उत्सव साजरे करण्यास प्रेरित करतात. त्यामुळे महापौर व महापालिकाही उत्सवप्रिय बनली आहे. शहरावर कोरोनाचे मोठे संकट असून त्यावर नियंत्रणासाठी पुढाकार घेण्याऐवजी उत्सव साजरे केले जात असल्याचा निषेध आहे. 
- प्रफुल्ल गुडधे पाटील,
ज्येष्ठ नगरसेवक कॉंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT