Rohit Pawar Detained 
नागपूर

Rohit Pawar Detained: पोलिसांनी संघर्ष यात्रा अडवली, नागपुरात मोठा गोंधळ; रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात

Sandip Kapde

Rohit Pawar Detained: रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूर येथे समारोप होत आहे. नागपूरच्या टेकडी परिसरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी हजेरी लावली. या सभेनंतर रोहित पवार यांनी त्यांचा मोर्चा थेट विधानभवनावर नेला.

यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अडवली आहे. रोहित पवार यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. (Latest Marathi News)

यावेळी रोहित पवार, रोहित पाटील यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यांना खासगी वाहनातून नेण्यात आले आहे. संघर्ष यात्रा विधानभवनावर जाणार होती. निवदेन स्विकारण्यासाठी रोहित पवार यांनी सरकारला अल्टिमेट दिला होता. मात्र सरकारकडून कोणीही निवेदन स्विकारायला आले नाही. त्यामुळे रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

रोहित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष यात्रा काढली आहे. युवकांचे प्रश्न, आरोग्य, शेती विषयक प्रश्नांबाबत ही यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा आज नागपुरात समारोप होता.

शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या पोरांवर लाठीचार्ज करत आहात. ही कसली दडपशाही आहे?, असा सवार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरकारला चर्चा करायला काय होत. आमदाराची ही परिस्थिती आहे तर गरीब लोकांची काय परिस्थिती असले?,असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT