RSS chief mohan bhagwat admitted to hospital after found corona positive in nagpur 
नागपूर

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, किंग्जवे रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे किंग्जवे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोनाने जिल्ह्याला विळखा घट्ट केला असून गेल्या चोविस तासांमध्ये दर दोन तासाला पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. बाधितांच्या संख्येनेही नवा उच्चांक गाठला. जिल्ह्यात शुक्रवारी गेल्या वर्षभरात एका दिवसातील सर्वाधिक ६ हजार ४८९ बाधित आढळून आले. सतत ६० पेक्षा जास्त मृत्यू व पाच ते साडेसहा हजारांपर्यंत बाधितांच्या संख्येने प्रशासनाच्या उपाययोजनेच्याही चिंधड्या उडविल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सामान्य नागरिकांतही दहशत असून चाचणी केंद्रांवरही रांगा दिसून येत आहे. 

सक्रिय रुग्ण ५० हजारांच्या उंबरठ्यावर 
सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४९ हजार ३४७ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरात ३२ हजार ५९७ तर ग्रामीण भागात १६ हजार ७५० रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एका आठवड्यापूर्वी २ एप्रिलला जिल्ह्यात ४० हजार ८०७ सक्रिय रुग्ण होते. त्यात आठवडाभरात ८ हजार ५४० रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता रुग्णालयात बेड्स मिळणेही कठीण झाले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT