RSS Headquarter in Nagpur
RSS Headquarter in Nagpur Sakal
नागपूर

नागपूर: RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला काश्मिरमधून अटक

वैष्णवी कारंजकर

नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणाऱ्या एका दहशतवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमधून रईस शेख याला अटक केली आहे. १५ जुलै २०२१ ला रईस शेखने नागपुरात रेकी केल्याचा आरोप आहे.

जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतलं. दहशतवादी रईस शेखची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून जैश - ए- मोहम्मदच्या हस्तकाच्या सांगण्यावरून रईस शेख जुलैमध्ये नागपुरात आला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत (RSS Headquarters in Nagpur) आणि हेडगेवार स्मृती मंदिराची त्याने पाहणी केली आणि तो काश्मिरला परतला. सप्टेंबर २०२१मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली. या ठिकाणांचा व्हिडीओ घेऊन त्याने तो हस्तकाला पाठवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT