rte admission starts from 3 march
rte admission starts from 3 march  
नागपूर

'आरटीई' प्रवेशाचा मुहूर्त ३ मार्चपासून, २१ मार्चपर्यंत अर्जनोंदणी

मंगेश गोमासे

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश दिले जातात. त्यानुसार ३ ते २१ मार्चपर्यंत पालकांना http://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. 

प्रत्येक शाळेत एकूण संख्येच्या २५ टक्के प्रवेश हे 'आरटीई'अंतर्गत दिले जातात. यासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. शहरातील ६५० शाळांच्या ५ हजार २८६ जागांसाठी आरटीईमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. गतवर्षी तुलनेत यावर्षी जागा कमी झाल्या आहेत. नागपूरमधून ६ हजार ६८५ जागांवर गेल्यावर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी ३१ हजारावर पालकांनी अर्ज करण्यात आले होते. राज्यात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरटीईची प्रक्रिया सुरू करण्यात येते. दरवर्षी आरटीई यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची वाट बघणे आता सुरू झाले असून पालकांकडून शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात येत होती. त्यातूनच शिक्षण विभागाकडून आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण करीत वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार २१ मार्चपर्यंत पालकांना अर्ज नोंदवायचे आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

अर्जसंख्या वाढणार -
आरटीई प्रवेशासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पालकांकडून विभागाला वारंवार विचारणा होताना दिसून येत आहे. यातूनच यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत अर्जांची संख्या वाढणार आहे. गतवर्षी ३१ हजारांवर पालकांनी अर्ज केले होते. यावर्षी ती वाढणार असल्याची शक्यता आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT