RTE registered school may fraud with parents nagpur news 
नागपूर

RTE नोंदणीकृत शाळांकडून पालकांची लूट? दोन युडायस क्रमांकाचा 'असा' केला जातो वापर?

नीलेश डोये

नागपूर : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत असून यावर येणारा खर्च शासनामार्फत शाळांना देण्यात येतो. परंतु, एकाच शाळेला १ ते ५ पर्यंत एक व त्यानंतरच्या वर्गासाठी वेगळा युडायस क्रमांक देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट होत असून कायद्यालाच हरताळ फासल्या जात असल्याचे दिसत आहे. 

प्रत्येक शाळांना एक क्रमांक देण्यात येते. याला युडायस म्हणतात. पूर्वी शाळांना वर्ग १ ते ४, ५ ते ८ व त्यानंतरसाठी वेगळा युडायस क्रमांक देण्यात येत होता. अलीकडच्या काळात यात बदल करण्यात आला. त्यानुसार वर्ग १ ते ५, ६ ते ८ व ९ ते १० या प्रमाणे वर्गवारी करण्यात आली असून यानुसारच मान्यता देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. आरटीई अंतर्गत वर्ग १ ते ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत आहे. आरटीई अंतर्गत नोंदणी करणाऱ्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येते. अनेक शाळांकडे दोन युडायस क्रमांक आहेत. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना फक्त १ ते ४ थी किंवा ५ पर्यंतचेच शिक्षण मोफत मिळते. युडायस क्रमांक बदलल्याने पुढील वर्गात संबंधित शाळांकडून प्रवेश नाकारण्यात येते. जिल्ह्यात २०० ते ३०० शाळांकडे दोन युडायस क्रमांक असण्याची शक्यता शिक्षण विभागीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये हा प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश करावा लागतो किंवा अधिकची रक्कम मोजावी लागते. ही एक प्रकारची लूट असल्याचे बोलल्या जात आहे. 

काही विद्यार्थ्यांना ५ वी नंतर शाळा बदलावी लागली. याबाबत शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. प्रवेश नाकारणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. 
-आशिष फुलझेले, मानवाधिकार संरक्षण मंच. 

जिल्ह्यातील शाळांची स्थिती 
सरकारी - १७७८ 
अनुदानित - ११८१ 
विनाअनुदनित - ११८३ 

यावर्षी ६८० शाळांची नोंदणी - 
५७२७ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश 

यूडायस क्रमांक म्हणजे काय?

U-DISE  चा लॉंगफॉर्म Unified District Information System for Education असा आहे. दरवर्षी शाळेची संपूर्ण माहिती युडायसमध्ये भरून द्यावी लागते आणि शाळेची माहिती एका वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे देशातील कोणत्याही शाळेची युडायसमधील माहिती किंवा स्कूल रिपोर्ट कार्ड त्या वेबसाईटवर मिळू शकतात. देशात कोणत्याही शासन मान्यता प्राप्त शाळेला युडायस असतो. मग ती शाळा कोणत्याही प्रकारची, व्यवस्थापनाची, माध्यमाची असो किंवा खाजगी असो, कोणताही  युडायस हा अकरा अंकी असतो. त्यामध्ये पहिले दोन क्रमांक हे कोणते राज्य आहे? ते दर्शवतात. त्यानंतरचे दोन अंक जिल्हा दर्शवतात. त्यानंतर दोन अंक तालुका, नंतरचे तीन अंक हे गावाचं नाव आणि शेवटचे दोन अंक त्या शाळेचा क्रमांक दर्शवतात.  

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT