नागपूर

RTO Firing Case: आरटीओ गोळीबार प्रकरण, कलेक्शनच्या वादातून गोळीबार करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा

मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकेपासून दिलेला तात्पुरता दिलासा कायम ठेवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur RTO Firing Case Anticipatory Bail: मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकेपासून दिलेला तात्पुरता दिलासा कायम ठेवला आहे. तसेच, पोलिसांतर्फे दाखल करण्यात आलेले उत्तर आज रेकॉर्डवर घेत न्यायालयाने प्रकरणावरील पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २) निश्‍चित केली.

न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. गुन्हे शाखेच्या कलमांनुसार, ७ मे २०२२ ला शेजवळ यांनी गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या कालावधीत सुरवातीला शेजवळ या भरारी पथकाच्या प्रमुख होत्या. त्यानंतर गायकवाड यांना प्रमुख करण्यात आले. (Latest Marathi News)

या कालावधीत तीन महिन्यांच्या कलेक्शनचा हिशेब जुळला नाही. त्यामुळे एका अधिकाऱ्याने हा हिशेब मागण्यासाठी गायकवाड यांना कामाला लावले. यावरून गायकवाड व शेजवळ यांच्यात धुसफूस सुरू झाली. यातूनच गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे कळते.

पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शेजवळ यांच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा लाच घेण्यासह सहा गुन्हे दाखल असून, त्यांची सखोल माहिती घेण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी शेजवळ यांनी सुरवातीला सत्र न्यायालयात अर्ज केला. (Latest Marathi News)

तो अमान्य झाल्याने त्यांनी वरिष्ठ अधिवक्ता अनिल मार्डीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना गेल्या सुनावणी दरम्यान अंतरिम दिलासा दिला होता व पोलिसांना नोटीस बजावली होती. यावेळी पोलिसांनी उत्तर दाखल केले. यावर शुक्रवारी सुनावणी निश्‍चित केली. तक्रारकर्त्यांच्यावतीने ॲड. देवेंद्र चौहान हे बाजू मांडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT