उमरेड : बंदमध्ये थोडी शिथिलता देताच भाजी बाजारात उसळलेली गर्दी. 
नागपूर

अहो, कोणी सांगेल का, ही मुंबई आहे की दिल्ली ?

सतिश तुळस्कर

उमरेड (जि.नागपूर) : कोरोना पार्श्‍चभूमीवर मुख्याधिकारी राजेश भगत यांनी शहरात रविवारी आणि सोमवारी असा दोनदिवसीय कडकडीत बंद घोषित केला होता. मात्र, मंगळवारी यातून सूट मिळताच स्थानिक मंगळवारीपेठेतील विनय टॉकीज ते रेल्वे स्टेशनपर्यंत भरलेल्या भाजीपाला बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. आजच्या परिस्थितीत ही गर्दी पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या नाहीत तरच नवल ! मात्र या गर्दीमुळे अनेक प्रश्‍नांना जन्म दिला.

भाजीपाला खरेदीसाठी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोना विषाणू लॉकडाउनच्या निमित्ताने नगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिक काटेकोरपणे पालन करताना दिसून येते. मात्र, ज्या वेळेस बंद मागे घेणे किंवा नियम अंशतः शिथिल केले जातात, तेव्हा मात्र उमरेडकर गर्दी करीत असल्याचे या बाजारावरून स्पष्ट होते. या अनुषंगाने मुख्याधिकारी भगत यांनी फळे व भाजीपाला विक्रेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला बाजार भरविण्याची मुभा दिली आहे. तरीसुद्धा मंगळवारी विनय टॉकीजचा परिसर असो किंवा इतवारीपेठेतील ठोक बाजार किंवा जुना मोटार स्टॅण्ड बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी व फळांची दुकाने थाटली असतात. तेव्हा जनता मोठ्या संख्येने खरेदीसाठी उतरते. त्यामुळे लॉकडाऊन व जमावबंदीचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे दिसून येते.

संक्रमणाची शक्‍यता
या प्रचंड गर्दीमध्ये जर एखादा कोरोनाबाधित रुग्ण मिसळला, तर तो शेकडोंच्या संख्येत नागरिक संक्रमित होईल, याची शक्‍यता नाकारता येत नाही. मंगळवार व बुधवारी व्यापारी संघटनेच्या विनंतीनुसार आम्ही दुकानदारांना सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देऊ. त्यानंतर मात्र नवा आदेश येईपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंतच दुकाने सुरू राहतील. यामध्ये औषधी दुकाने, दवाखाने व पेट्रोलपंप उशिरापर्यंत सुरू राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी भगत यांनी दिली.

दंडात्मक कारवाई होईल !
बाजारात वारंवार उसळणारी लोकांची गर्दी लक्षात घेऊन गर्दी नियंत्रण पथक उभारण्यात आले आहे. दररोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराच्या जागी उपस्थित राहून ते पथक गर्दी नियंत्रित करतील आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील. याशिवाय गर्दी कमी करण्यासाठी वस्त्यांमध्ये हातगाडीवर भाजीविक्रेते भाजी विकू शकतील.
-राजेश भगत, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT