Saffron Saffron
नागपूर

अरे बापरे! केसर १ लाख ३५ हजार रुपये किलो

राजेश रामपूरकर

नागपूर : मजुरांची टंचाई आणि उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे केसरचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यंदा केसरचे भाव आकाशाला भिडले आहे. एक किलो केसरसाठी १ लाख ३५ हजार रुपये मोजावे लागत आहे. सोन्यापेक्षा महाग असलेले केसर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. केसर अन्नाची चव देखील वाढवते.

केसरचे उत्पादन कश्मीर आणि थंड हवेच्या परिसरात होते. यंदा काश्मीरमध्ये कामगारांच्या टंचाईचा फटका केशरच्या उत्पादनावर पडला आहे. तीन महिन्यांपूर्वी १ लाख २० हजार रुपये किलो असलेली केसर १ लाख ३५ हजर रुपये किलोवर गेली आहे. म्हणजे एक ग्रॅम केसरसाठी १३५ रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे मिठाईचा स्वाद बिघडला आहे.

तीन महिन्यांपूर्वी हाच भाव १२० रुपये ग्रॅम होता. केसरच्या लागवडीपासून बाजारात विक्री होईपर्यंत ही प्रक्रिया खूप कठीण आहे. केसर शेतात तयार होण्यापासून तर हवाबंद डब्ब्यात पॅक होईपर्यंत खूप मेहनत लागते. केसरची लागवड ऑगस्टमध्ये केली जाते आणि फूल येण्याची सुरुवात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. या फुलांच्या प्रक्रियेस फक्त एक महिना लागतो.

असे मानले जाते की ते १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान होते. त्याचवेळी केसरला पाणी हे नैसर्गिकरीत्या दिले जाते म्हणजे पावसाच्या पाण्यावर केसरची शेती केली जाते. त्यामुळे फुले काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि श्रम खर्च खूप जास्त असतो. काश्मीरच्या फक्त एका भागात केसरची जास्त लागवड केली जाते. कारण, तेथे विशेष लाल रंगाची माती आहे, ज्यामध्ये केशराची लागवड केली जाते असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्यांत केसरचे भाव वाढले आहे. कामगारांची अडचण असल्याने केसरची तोड झालेली नाही. मागील वर्षी ९० हजार रुपये किलो असलेले केसर आता १ लाख ३५ हजार रुपये किलोवर गेले आहे.
- किरण भाई, संचालक, श्री ट्रेडर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कंपनी असावी तर अशी' कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली महागडी कार, Video पाहून नेटकरी म्हणाले, 'असं नशीब सगळ्यांचं नसतं'

हरदीप सिंग पुरी राज्यसभेची पोटनिवडणूक लढणार, भाजपने उमेदवारी केली जाहीर

Abhijit Bhosale Six Months Jail Sentence : सांगलीत मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाला 6 महिने तुरुंगवास, कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चलबिचल

Cyclone Arnab Photo: भारतावर चक्रीवादळाचे संकट! अंतराळातून टिपले पृथ्वीचे फोटो... भीषण दृश्य, अनेक राज्यांना धोका

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये दुष्काळ अन् वाढत्या उष्णतेचा द्राक्षबागांना फटका; बागा वाचवण्यासाठी कालव्याच्या पाण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT