Samit Thakkar jumps into Sachin Waze case; Controversial tweet made
Samit Thakkar jumps into Sachin Waze case; Controversial tweet made 
नागपूर

समीत ठक्करची सचिन वाझे प्रकरणात उडी; केले वादग्रस्त ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे समीत ठक्करला अटक करण्यात आली आहे. ३२ वर्षीय समीतने मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणावर ट्वीट केला आहे. यामुळे एपीआय सचिन वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीत ठक्करने आपल्या ट्वीटमध्ये सचिन वाझेच्या संपर्कात असलेला आमदार कोण? त्यांचे सचिन वाझे यांच्याशी नेमके संबंध काय? मनसुख हिरेन यांचा मृत्यू कशाने झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. समीत ठक्कर ट्विटरवर सक्रिय राहणारा नागपूरचा तरुण आहे.

नागपूरच्या व्हिएमवी कॉलेज मधून बीकॉमचे शिक्षण घेणारा समित आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. समीत ठक्करचे कुटुंब नागपूरच्या वाथोडा भागातील व्यवसायिक कुटुंब आहे. ठक्कर कुटुंबाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून समीत ही याच व्यवसायात सहभागी आहे. समितचे काका कधी काळी शिवसेनेचे स्थानिक नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाही.

समीत ठक्कर वादग्रस्त

समीतने ठाकरे पितापुत्रांच्याविरोधात ट्विटरवर दोन आक्षेपार्ह पोस्ट केले होते. याप्रकरणी नागपूर तसेच मुंबईच्या व्ही.पी. मार्ग पोलिस ठाण्यात ठक्कर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ठक्करने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने त्याला तिथल्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असल्यानं तो पळून जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT