नागपूर : वंजारीनगर रस्त्यावर केलेल्या ट्विटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे माजी महापौर संदीप जोशी यांनी आपण समाजसेवेसाठी ‘चोवीस बाय सेव्हन’ उपलब्ध असल्याचे सांगून राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहे.
नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीत जोशी यांचा धक्कादायक पराभव झाला होता. तत्पूर्वीच त्यांनी आता आपण महापालिकेची निवडणूक यापुढे लढणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे जोशी आता काय करणार असा सवाल उपस्थित केला जात होता. पदवीधर निवडणुकीनंतर ते थोडे अल्पित झाल्याचे दिसत होते. या दरम्यान त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून तयार झालेल्या वंजारी नगरच्या रस्त्यावर ट्विट केले.
त्यांनी शहरात एक सुंदर अपघात स्थळ निर्माण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याला ‘शेम’ असे संबोधले होते. त्याचे प्रत्येकजण आपआपल्या सोयीने अजूनही राजकीय अर्थ लावत आहेत. उद्घाटनच्या कार्यक्रमात गडकरी यांनीसुद्धा जोशी यांच्या ट्विटची दखल घेऊन अपघात होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोबतच काही सूचनाही केल्या आहेत.
दरम्यान, नववर्षाचे निमित्त साधून जोशी यांनी सर्व कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छांसह पदवीधर निवडणुकीत केलेल्या सहकार्याबाबत आभार पत्र पाठवणे सुरू केले आहे. त्यात त्यांनी पराभवातून धडा घेऊन, आत्मचिंतन करून चुका दुरुस्त करायचे असल्याचे म्हटले आहे. पराभवावर अश्रू गाळण्यापेक्षा नव्या उमेदीने आणि उत्साहाने पक्षसंघटनेत कामाला लागायचे आहे.
एका पराभवाने आपले काम थांबणारे नाही. समाजसेवेचा आपला पिंड आहे. तो सुरूच राहणार आहे. पदवीधरांचे प्रश्न असो वा ‘शिक्षकांचे’ ते सोडवण्याचा प्रयत्न सुरूच राहील. प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ, असे सांगून संदीप जोशी यांनी भविष्यातील वाटचालीचेही संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.