S B jain. 
नागपूर

कोरोनापासून बचावासाठी त्याने केले अफलातून संशोधन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "विपरीत परिस्थिती किंवा काळामध्ये करण्याजोगे नक्कीच काहीतरी सदैव असते व त्यात यशस्वी देखील होता येते ' हे जेष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग्ज यांचे वचन प्रमाण मानून कौस्तुभ वामन ठोंबरे या एस.बी.जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने"कोरोना" महामारी विरुद्धच्या लढ्यात सहभागी होत सॅनिटायझर कक्षाची निर्मिती केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करणे आवश्‍यक आहे. यासाठी विविध संस्था प्रयत्नशील आहेत. यात एस.बी.जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या कौस्तुभ ठोंबरे याने सॅनिटायजर कक्षाची निर्मिती केली आहे. यासाठी त्याने मोटर, टिन शेड, फवारणी यंत्रणा वापरून त्याद्वारे "आयसो प्रोपाईल अल्कोहोल'चा वापर केला असून अवघ्या 40 हजारात सॅनेटायजर कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षातून रसायनाची फवारणी करून कोरोना या जीवघेण्या विषाणूपासून नागरिकांचा बचाव करण्यात येतो. सॅनेटायजर कक्षातुन फवारणी घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा किमान तासांपर्यंत कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो, असे कौस्तुभ सांगतो. या सोप्या व प्रभावी पध्दतीचा फायदा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणांत घेत आहे. अजून असे सॅनेटायजर कक्ष लागल्यास आपण ते उपलब्ध करून देऊ शकतो असेही तो म्हणाला. यासाठी उदार दात्यांनी पुढे येऊन या महामारीतून नागरिकांचें प्राण वाचविण्यात सहकार्य करावे असे आवाहन कौस्तुभने केले आहे. आपले पहिले सॅनेटायजर कक्ष त्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सौसर यांना भेट म्हणून दिले आहे. एप्रिल पासून या द्वारे औपचारिक सेवेची सुरुवात झाली असून ते सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले आहे

अधिकारी, महाविद्यालयाकडून कौतुक
आरोग्य विभाग अधिकारी सौसर, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अग्रवाल ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बडजाते, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व टेली कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. अभय कासेटवार व इतर प्राध्यापकांनी कौस्तुभचे अभिनंदन केले असून त्याचे सर्व सामाजिक स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT