The school does not want a corona test report from a private center 
नागपूर

शाळांची शिक्षकांना तंबी; सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतूनच आणलेला अहवाल ग्राह्य धरणार

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बरेच शिक्षक कोरोना चाचणी निगेटिव्ह यावी यासाठी खासगी तपासणी केंद्रातून आणलेला अहवाल शाळांमध्ये सादर करीत आहेत. त्यामुळे शाळांनी केवळ सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतून आणलेला अहवालाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची तंबी शिक्षकांना दिली आहे.

राज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मात्र, हा निर्णय घेताना स्थानिक प्रशासनालाही अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी राज्याने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांमध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र, यापैकी काही शिक्षक खासगी तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करीत आहे आणि स्वतःच्या अहवालात बदल करण्याचे काम करीत आहेत.

त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने शाळांकडून आता केवळ सरकारी तपासणी केंद्रातील कोरोना तपासणी अहवाल ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय ‘ॲन्टीजेन’ तपासणी ऐवजी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शाळांकडून देण्यात आले आहेत.

तपासणी केंद्रांवर गर्दी

कोरोना चाचणीचा अहवाल शाळेतील मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर पाठवायचा असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी कोरोना तपासणी केंद्रांवर तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT