file photo 
नागपूर

शाळा भरली, पण मास्तरांची... व्यवस्थापन संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (नागपूर) : उन्हाळ्याच्या सुटीनंतर दरवर्षी 26 जूनला शाळा सुरू होते. या वर्षीही पहिल्या दिवशी शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्याचे पहिले वर्ष आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेबाहेर दिसले. या वर्षी मास्तरांचीच शाळा भरली, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही शाळा व्यवस्थापनांनी पालकांची बैठक 27 जून रोजी आयोजित केली आहे. 

हिंगणा तालुक्‍यात 84 प्राथमिक शाळा, 40 उच्च प्राथमिक, 2 माध्यमिक अशा एकूण 126 शाळा कार्यरत आहेत. शासकीय मुलांचे वसतिगृह व काही शाळांमध्ये शासनाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. कोरोनाचा कहर मार्चमहिन्यात सुरू झाला; तेव्हापासून शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या. 

26 जूनपासून शाळा सुरू झाल्या. कोरोनाच्या संक्रमणामुळे या वर्षी शाळेत पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी आला नाही. केवळ मास्तरांची शाळा भरल्याचे चित्र दिसून आले. हिंगणा तालुक्‍यात 87 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. हिंगणा एमआयडीसी परिसर कोणाचा हॉटस्पॉट बनला आहे. 
अशा स्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत कसे बोलवायचे, असा प्रश्‍न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. 

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांसोबत शाळा व्यवस्थापनाने बैठक घेतली. हिंगणा तालुक्‍याचा परिसर रेड झोनमध्ये असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही शाळा व्यवस्थापनाने 27 जूनला पालकांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पालकांसोबत चर्चा करून व्यवस्थापन अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. हिंगणा तालुक्‍यात एमआयडीसी परिसरातील पारधीनगर, लोकमान्यनगर, गजानननगर, इसासनीमधील भीमनगर, राजगुरुनगर, नीलडोहमधील अमरनगर, वागदरा, मोंढा येरणगाव या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हिंगणा तालुका जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. यामुळे शासनाने हिंगणा तालुक्‍यातील शाळा कोरोनाचा कहर संपेपर्यंत बंद ठेवाव्या, अशी मागणी आता पालकांमध्ये जोर धरू लागली आहे. 

घरी जाऊन नवागतांचे स्वागत 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावात दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट घेण्यात आली. पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. पालकांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक बळीराम चापले यांनी विद्यार्थी व समितीचे सदस्यांना मास्क वाटप केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश राजपूत, शिवसाजन राजपूत, राजेंद्र राजपूत, अगंणवाडी सेविका सुरेखा पवार, सहायक शिक्षिका वेणू राठोड आदी उपस्थित होते. 

पहिली घंटा वाजलीच नाही 
जूनला प्रत्येक जिल्ह्यात शाळा सुरू व्हायच्या. पहिल्याच शाळेत किलबिलाट व्हायचा. मात्र, या वर्षी कोरोनामुळे हा योग जुळून आला नाही. शासनाने प्रत्येक वर्गवारीनुसार वेळापत्रक तयार करून 1 जुलै, तर काही वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरवले. त्यामुळे शाळेची पहिली घंटा आज वाजलीच नाही. मात्र, सर्व शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली होती. काही गावांत मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती व नागरिकांची सभा बोलावून शाळा सुरू करायची की नाही, यावर चर्चा केली. सभेत एक दिवसाआड वर्गानुसार शाळा घेण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आलग. शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. सभेला पंजाबराव फरकाडे, राजू पोहनकर, ज्योती हिंगणकर, राजूजी बारेकर, सौ. झाडे, कमलाकर हिंगणकर, पोहणकर, बनकर, म्हैसकर, सौ. इंगळे, रेवतकर व पालक उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT