Schools in rural areas are also closed till December 13 
नागपूर

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील शाळांसाठी घेतला मोठा निर्णय 

नीलेश डोये

नागपूर  : ग्रामीण भागातील शाळाही शहरी भागातील शाळांप्रमाणे १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ही माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे शासनाचे निर्देश होते. परंतु परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली. पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग सुरू होणार होते. यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यासोबतच पालकांच्या संमती आवश्यक करण्यात आली होती. 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी १३ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर ग्रामीण भागातील शाळा २३ पासूनच सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर २६ डिसेंबरपासून शाळा करण्याचे ठरविण्यात आले. परंतु याला अनेकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे आता १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्‍याची माहिती ठाकरे यांनी दिली.

५६ शाळांचा नकार

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ९ ते १२ वर्गाच्या ६५७ शाळांमध्ये जवळपास १ लाख ३० हजार ४५४ विद्यार्थी आहेत. ३४२१३ पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले आहे. तर ५६ शाळांमधील पालकांनी शाळा सुरूच करू नये म्हणून पत्र दिले.

१०६ शिक्षकांना कोरोना

ग्रामीण भागातील ६५७ शाळांमध्ये ५९४४ शिक्षक कार्यरत आहेत. तर ३२०३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते. त्यानुसार आजवर ४८६२ शिक्षकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या असून, त्यापैकी १०६ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालातून समोर आले.

 
बहुतांश लोकांची असहमती 
अनेकांशी चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मतही जाणून घेण्यात आले. यातील बहुतांश लोकांनी शाळा सुरू करण्यास असहमती दाखविली. त्यामुळे शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
-रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.  
 
संपादन : अतुल मांगे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT