The scrap policy slowed down sales of used vehicles 
नागपूर

स्क्रॅप पॉलिसीमुळे मंदीसदृष्य स्थिती; जुन्या वाहनांच्या खरेदीची तयारी करणारे ग्राहक संभ्रमात

योगेश बरवड

नागपूर : देशात येऊ घातलेल्या नव्या भंगार धोरणामुळे (स्क्रॅप पॉलिसी) जुन्या वाहनांच्या खरेदीची तयारी करणारे ग्राहक संभ्रमात पडले आहेत. त्याचा थेट परिणाम जुन्या वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. २००७ पूर्वीच्या वाहनांना ग्राहकच मिळत नसल्याने या क्षेत्रात मंदीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.

दुचाकी वाहने घरोघरी पोहोचली आहेत. नवीन वाहनाची खरेदी शक्य नसणाऱ्यांकडून चांगल्या स्थितीतील जुने वाहन खरेदी करून दुधाची तहान ताकावर भागवली जाते. परिणामी काही वर्षांमध्ये जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नवीन कार खरेदीच्या तुलनेत जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

५ ते १५ वर्षे जुनी वाहने ७० हजारांपासून १५ लाखांच्या घरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या व्यवसायातील संधी लक्षात घेऊन अनेकांनी त्यात शिरकाव केला आहे. आजघडीला एकट्या नागपूर शहरात जुन्या वाहनांची विक्री करणारी ४०० हून अधिक प्रतिष्ठाने आहेत. काहींनी तर अक्षरशः शोरूमच थाटली आहेत. याशिवाय वैयक्तिक स्तरावर मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहेत.

कोरोना काळात अन्य सर्वच व्यवसायांप्रमाणेच हा व्यवसायही थांबला होता. अलीकडेच तो सावरू लागला आहे. त्यातच केंद्र सरकारने स्क्रॅप पॉलिसी आणण्याची घोषणा केली. त्याद्वारे १५ वर्षे जुनी व्यावसायिक व २० वर्षे जुनी खासगी वाहने भंगारात काढण्याचा नियम केला जाणार आहे. यामुळे जुने वाहन असणारे किंवा ती घेण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जुनी वाहने मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. ग्राहक मात्र वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

खरेदीदार अगदीच बेपत्ता झाले
व्यावसायिक वाहनांचे खरेदीदार तर अगदीच बेपत्ता झाले आहेत. या प्रकाराने वाहतुकीचा व्यवसाय करणारे गरीब व्यक्ती सर्वाधिक अडचणीत आले आहे.
- शहारूख शेख,
जुन्या वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे

कुटुंबाचे उदरभरण करायचे कसे?
माझ्याकडील व्हॅन २० वर्षे जुनी आहे. कसाबसा ते व्यवसाय करीत होते. वर्षभरापासून शाळा बंद आहेत. गाठीला असणाऱ्या पैशातून घर चालविले. आता ही व्हॅन स्क्रॅप झाल्यास कुटुंबाचे उदरभरण करायचे कसे, हा प्रश्न आहे.
- नितीन लांबट,
स्कूल व्हॅन चालवणारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT