Search for new Vice Chancellor at Nagpur University 
नागपूर

कुलगुरू निवड समितीत हे आहेत सदस्य... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे 8 एप्रिलला कुलगुरू पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानुसार नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध घेण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून, अध्यक्षपदी सेवानिवृत्त जस्टीस दिलीप भोसले यांची तर सदस्य सचिव म्हणून पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांची निवड केली आहे. यापूर्वीच संयुक्त समितीने सदस्य म्हणून आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांची निवड केली आहे. 

दर पाच वर्षांनी कुलगुरू पदावर निवड समितीच्या माध्यमातून पात्र व्यक्तींची निवड केली जाते. त्यानुसार 8 एप्रिलला कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, समितीवर विद्यापीठाकडून एका सदस्याला पाठविल्यावर अध्यक्ष व सदस्य सचिवाची निवड झालेली नव्हती. त्यामुळे प्रक्रिया लांबणार असे चित्र निर्माण झाले होते. आज राज्यपाल कार्यालयाने समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिवाच्या नावाची घोषणा केली.

समिती तयार झाली असली तरी, प्रत्यक्षात अध्यक्षांसोबत सदस्यांची एकही बैठक झाली नसल्याने कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. मात्र, बैठक होताच, जाहिरात काढण्यात येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान ही प्रक्रिया 8 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार नसल्याने कुलगुरू डॉ. काणे निवृत्त होताच, कुलगुरूपदाचा कार्यभार प्रभारीच्या खांद्यावर येण्याची शक्‍यता आहे. 

गेल्यावेळी कुलगुरूपदासाठी देशभरातून जवळपास 132 अर्ज आले होते. त्यापैकी छाननी समितीने 18 अर्ज अंतिम केले होते. मात्र, त्यापैकी पाच व्यक्तींची मुलाखतीसाठी निवड केली होती. त्यात डॉ. काणे सोडल्यास नागपुरातील एकाही व्यक्‍तीचा समावेश नव्हता. यावेळीही कुलगुरूपदासाठी इच्छुकांची गर्दी बघायला मिळणार आहे. 

प्रक्रिया लांबणार

 
नियमानुसार आठ एप्रिल रोजी कुलगुरू निवृत्त होत असल्याने त्याच दिवशी नव्या कुलगुरूने पदभार स्वीकारणे अपेक्षित असते. मात्र, समितीची स्थापना झालेली नसल्याने ती स्थापन करुन विद्यापीठाला जाहिरात द्यावी लागणार आहे. जाहिरात दिल्यावर किमान एक महिना अर्ज मागविणे, त्यानंतर छानणी आणि मुलाखत अशी प्रक्रिया यासाठी पंधरा ते महिनाभर लागतो. ही प्रक्रिया दीड महिन्यात होणे शक्‍य नाही. त्यामुळे या प्रक्रियेला संपूर्ण मे उजाडणार असून जुन महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT