नागपूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३३ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग तर ३३ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी दुसरा भाग भरला आहे. ३० तारखेपासून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, दुसरा भाग भरणाऱ्यांपैकी केवळ २९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरले असल्याने अकरावी प्रवेशावर रिक्त जागांचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. १९० महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसीच्या एकूण ५८ हजार २४० जागा होत्या.
यांपैकी तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये २२ हजार ५०१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला होता. ३५ हजार ७४१ जागा रिक्त राहिल्या होत्या. यानंतर विशेष फेरी राबविण्यात आली. शेवटी २१ हजार २८२ जागा रिक्त राहिल्या. यावर्षी निकालात २६.५७ टक्के वाढ झालेली आहे. त्यादृष्टीने नोंदणी जागांपेक्षा अधिक होणे अपेक्षित होते. दरम्यान २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती यादी प्रकाशित करण्यात आली. यात अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याची मुभा देण्यात आली.
अधिक माहितीसाठी - पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज! काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’
याच दिवशी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. यामध्ये कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले. मात्र, प्रवेशाचा विचार केल्यास अद्याप केवळ २९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरले आहेत. या विद्यार्थ्यांची ३० तारखेला पुन्हा अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल. यानंतर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविता येणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरुच राहणार असल्याने त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, आकडेवारी बघता अकरावीच्या रिक्त जागांची संख्या वाढणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.
जागांची संख्या - ऑप्शन भरलेले
कला ९,६६० २,६०९
वाणिज्य १७,९२० ८,५१०
विज्ञान २७,३३० १६,९४९
एमसीव्हीसी ४,१३० १,०९१
…………………….
एकूण ५९,०४० २९१५९
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.