The second dose of the clinical trial from August ten 
नागपूर

#GoodNews : कोव्हॅक्‍सिन लसीचा दुसरा डोस १० ऑगस्टला; पहिला प्रयोग यशस्वी होण्याचा विश्वास 

केवल जीवनतारे

नागपूर : भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्‍सिन लसीची क्‍लिनिकल ट्रायल नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलै रोजी सुरू झाली होती. सात दिवसांमध्ये ५५ स्वंयसेवकांना लस टोचली असून आतापर्यंत कोणालाही रिऍक्‍शन झालेली नाही. हे नागपुरातील क्‍लिनिकल ट्रायलमधील यश आहे. १० ऑगस्टपासून क्‍लिनिकल ट्रायलचा दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, ५५ जणांचे रक्त तपासणीसाठी दिल्ली येथे सेंट्रल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. 

नागपुरातील गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २० ते ५५ वर्षीय वक्तींवर चाचणी करण्यात आली. त्यांना पहिला डोस दिला. दर दिवसाला त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी टोचलेल्या २० वर्षीय युवकासह दोघांना दुसरा डोस १० ऑगस्टच्या दरम्यान देण्यात येईल. दरम्यान, या लसीचे पहिल्या टप्यातील ५५ व्यक्तींवरील निरीक्षणही सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे आता नागपूरच्या चाचण्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

देशातील एकूण १२ केंद्रांवर या चाचण्या होत आहेत. ५५ व्यक्तींना लस दिल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येईल. यानंतर सातत्याने २४ दिवसानंतर २८, ४२, १०४ आणि १९४ व्या दिवशी लस टोचली जाईल. प्रत्येकाच्या रक्ताची चाचणी करून ऍन्टिबॉडीची तपासणी केली जाईल. त्यानंतरच आपण निष्कर्षावर पोहोचू अशी माहिती गिल्लूरकर रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली. 

दुसरा डोस १० ऑगस्टला 
कोव्हॅक्‍सिन लसीच्या प्री-क्‍लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांची कोरोना चाचणीसह संबंधित इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतरच ६० जणांना ही लस टोचली गेली. यापैकी ५५ जणांच्या लस टोचल्यानंतर परिणाम चागंले दिसून आले. कोणावरही लसीचा दुष्परिणाम झाला नाही. लसीचा पहिला डोज देण्यात आलेल्या व्यक्तींला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस १० ऑगस्ट रोजी देण्यात येईल. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. दुसऱ्या लसीचा डोसचा असाच सकारात्मक परिणाम येण्याची शक्यता आहे. 
- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, 
संचालक, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Fraud Case: मुंढवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई! पोलिसांनी निबंधक कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली

Dog Attacks : नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास महापालिका, ग्रामपंचायतींना द्यावे लागणार उत्तर; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

Kolhapur News: ओबीसी महिला प्रवर्गामुळे रंगणार बहुरंगी सामना; कळेत राजकीय घराण्यांची धावपळ वाढली!

Success Story: अठरा वर्षांच्या अंतरानंतर ‘ती’ बनली सनदी लेखापाल; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली तयारी

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर ATCमध्ये मोठा बिघाड, ९०० विमानांना विलंब तर २० उड्डाणे रद्द; ३६ तासांनतर काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT