second stage of clinical trial of corona vaccine started in nagpur
second stage of clinical trial of corona vaccine started in nagpur  
नागपूर

कोरोना लसीबाबत मोठी बातमी! नागपुरात क्‍लिनिकल ट्रायल चा दुसरा टप्पा सुरू.. काय आहे डॉक्टरचं म्हणणं..वाचा 

केवल जीवनतारे

नागपूर:  नागपुरात भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्‍सिन लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा येथील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ११ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. मंगळवारी ७ जणांना लस टोचून दुसऱ्या टप्प्प्यातील लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलची सुरूवात झाली. या सात जणांना पहिल्या लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलचा पहिला डोस २७ जुलै रोजी दिला होता. तर सात दिवसांत ५५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली होती.

मंगळवारी पहिल्या टप्प्यातील २०, २२ आणि ३२ वर्षीय युवकांसह ५३ वर्षीय महिलेस कोव्हॅक्‍सिन लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलचा दुसरा डोस दिला. यानंतर या सर्वांना हॉस्पिटलमध्ये आठ ते दहा तास निरिक्षणात ठेवण्यात आले. १४ दिवसानंतरचा हा डोस दिल्यानंतर त्यांच्या रक्ताचा अहवाल दिल्ली येथे सेंट्रल लॅबकडे पाठविण्यात येईल. या लसीचे पहिल्या टप्प्यातील ५५ व्यक्तींवरील निरीक्षणही सकारात्मक दिसून आल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील ही सुरूवातही यशस्वी होत असल्याचे संकेत मिळाले.

देशातील एकूण १२ केंद्रांवर या चाचण्या होत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ५५ जणांचा रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी २८ दिवसांनंतरचा डोस देण्यात येईल. पुढे ४२, १०४ आणि १९४ व्या दिवशी लस टोचण्यात येईल. प्रत्येकाच्या रक्ताची चाचणी करून ॲन्टिबॉडीची तपासणी करण्यात येईल. यावरच या लसीचे यश अवलंबून असल्याचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी ‘सकाळ'ला सांगितले.

डोसचा असाच सकारात्मक परिणाम येईल
"कोव्हॅक्‍सिन लसीच्या प्री-क्‍लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा मंगळवारी सुरू झाला. आज सात जणांना दुसरा डोस दिला. यानंतर सलग सात दिवस ५५ जणांना दुसरा डोस देण्यात येईल. लसीच्या क्‍लिनिकल ट्रायलचा डोस दिल्यानंतर कुणावरही दुष्परिणाम दिसून आला नाही. दुसऱ्या डोसचा असाच सकारात्मक परिणाम येईल, अशी शक्यता आहे".
-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर
संचालक, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT