second stage of clinical trial of corona vaccine started in nagpur  
नागपूर

लवकरच येणार 'कोविशिल्ड'; आजपासून नागपुरात लशीची दुसरी मात्रा; मेडिकलमध्ये स्वयंसेवकांच्या चाचण्या

केवल जीवनतारे

नागपूर : दुसऱ्या लाटेचा धोका असताना कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लशीची क्‍लिनिकल ट्रायल नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मेडिकलमध्ये ५० व्यक्तींना ही लस टोचली. लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याने लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. सोमवारपासून (ता. २३) लशीची दुसरी मात्रा सुरू करण्यात येईल. यासाठी स्वयंसेवकांच्या रक्त व इतर सर्व चाचण्या करण्यात आल्या.  

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केलेल्या लशीची पहिली चाचणी यशस्वी झाली. पुण्यातील सिरम कंपनीच्या माध्यमातून कोविशिल्ड लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. 

या लशीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली. नागपुरातील मेडिकलमध्ये वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस टोचण्याला येत्या २३ नोव्हेंबरला २८ दिवस पूर्ण होतील. यामुळे मेडिकलच्या केंद्रात स्क्रीनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील निरोगी असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येईल. 

पहिल्या टप्प्यात १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस दिली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली. लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वॉर्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले गेले. 

मेडिकल वैद्यकीय शैक्षणिक संस्था आहे. यामुळे येथे संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. सध्या डॉक्टर कोरोना नियंत्रणासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. विशेष असे की, रुग्णसेवेसोबत संशोधनासाठी अतिरिक्त वेळ देत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील लशीनंतर अँटिबॉडीच्या सकारात्मक परिणामाकडे लक्ष देण्यात येत आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचे मोलाचे योगदान या क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे.  
-डॉ. सुशांत मेश्राम, समन्वयक, 
कोविडशिल्ड लस क्लिनिकल ट्रायल तसेच विभागाप्रमुख श्वसनरोग, मेडिकल-सुपर

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT