Synthetic Track sakal
नागपूर

Synthetic Track : सात वर्षांत दुसऱ्यांदा उखडला सिंथेटिक ट्रॅक; जागोजागी निघाले पोपडे

सात वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅक खराब झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सात वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅक खराब झाला. जागोजागी त्याचे पोपडे निघाले आहेत. त्यामुळे सराव करताना धावपटूंना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सात वर्षांत दुसऱ्यांदा हा ट्रॅक उखडला आहे. त्यामुळे ट्रॅकच्या एकूणच दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूरसह विदर्भातील युवा धावपटूंना दर्जेदार ट्रॅकवर नियमित सराव करता यावा तसेच उपराजधानीत राज्य, राष्ट्रीय व अन्य स्पर्धांचे आयोजन व्हावे या उद्देशाने २०१७ मध्ये तब्बल साडेबारा कोटी रुपये खर्च करून विदर्भातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला. मात्र गेल्या उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे अनेक ठिकाणी तो उखडला. ट्रॅकचा फेरफटका मारला असता, किमान ४० ते ५० ठिकाणी पोपडे (बबल्स) निघाल्याचे दिसून आले.

विशेषतः आतील मैदानाजवळील पहिल्या लेनमध्ये ट्रॅक जास्ती खराब झाला आहे. जागोजागी पोपडे निघाल्याने धावपटूंना सराव करताना अडचणी येत आहे. धावताना त्यात पाय अडकून इजा होण्याचीही शक्यता आहे. सराव करताना आपण पडता-पडता वाचल्याचे येथे नियमित सराव करणाऱ्या एका धावपटूने सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, मानकापुरात दररोज सकाळी व सायंकाळ शहरातील शेकडो युवा धावपटू सराव करतात.

कडक उन्हामुळे ट्रॅक खराब?

यासंदर्भात क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनीही काही ठिकाणी ट्रॅक खराब झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, यावर्षी कडक उन्हाळा तापल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. विदर्भातील एकूणच वातावरण, येथील काळी माती (ब्लॅक कॉटन सॉईल) आणि नुकताच झालेला पाऊस, हीदेखील यामागची कारणे आहेत. आम्ही याबाबत नागपूर सुधार प्रन्यास आणि हैदराबादस्थित कंत्राटदार कंपनीला कळविले आहे. पाऊस कमी झाल्यानंतर व २५ तारखेला होणारी अग्निवीर भरती आटोपल्यानंतर ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्येही उखडला होता ट्रॅक

सुरवातीला निकृष्ट बांधकाम झाल्याने २०१८ मध्ये अवघ्या वर्षभरातच हा ट्रॅक उखडला होता. जिल्हा ॲथलेटिक्‍स संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंनीही यावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती. उल्लेखनीय म्हणजे, आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळी नागपुरात आलेले क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनीदेखील निकृष्ट बांधकामाला कारणीभूत कंत्राटदाराला झापले होते. सदोष ट्रॅकमुळे प्रशासनाची सर्वत्र ‘छीथू’ झाल्यानंतर अखेर कंत्राटदार कंपनीकडून ट्रॅक दुरुस्त करवून घेण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT