खोदकाम करण्यात आलेले ठिकाण खोदकाम करण्यात आलेले ठिकाण
नागपूर

गुप्तधनासाठी पुरातन मंदिराखाली खोदकाम! भाविकांच्या भावना दुखावल्या

मंदिराचे असे अवैधरीत्या खोदकाम करून मंदिराचा अवमान करून भाविकांच्या भावनेशी खेळ खेळणारा प्रकार आहे

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिषदअंतर्गत असलेल्या कमसरी बाजार वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या पुरातन राम मंदिराच्या पायथ्याखाली अनोळखी लोकांनी खोदकाम केल्याची घटना आज (ता. १०) सकाळी निदर्शनास आली. हे खोदकाम गुप्तधन काढण्यासाठी केले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागात पोलिस गस्त वाढवून घटनेचा छडा लावून हे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत नवीन कामठी पोलिसांत धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, कमसरी बाजार वस्तीपासून काही अंतरावरील निर्जनस्थळी पुरातन राम मंदिर आहे. या मंदिरात भाविक पूजाअर्चेसाठी येतात. या मंदिराशी भाविकांच्या श्रद्धा जुडलेल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या देखरेखीकडे भक्तगणांचे लक्ष असतेच. सोमवारी न्यू येरखेडा रहिवासी माजी सैनिक मनबहाद्दूर भंडारी यांनी पत्नीसह मंदिरात पूजा केली.

१२ फेब्रुवारीला असलेल्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मंदिराची (temple) साफसफाई करण्याचे नियोजित करून आज सकाळी मंदिराला भेट दिली असता मंदिरामागे मंदिराच्या पायथ्याखाली काही लोकांनी खोदकाम केल्याचे दिसले. दरम्यान मंदिराखाली खड्डा खोदलेला असून, लोखंडी घमेले तसेच पावडे दिसून आले. हे खोदकाम मध्यरात्री करण्यात आले असून गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने हे खोदकाम केले असावे, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

मात्र, कुण्या मंदिराचे (Temple) असे अवैधरीत्या खोदकाम करून मंदिराचा अवमान करून भाविकांच्या भावनेशी खेळ खेळणारा प्रकार आहे. या प्रकारामुळे मंदिराशी आस्था जुळलेल्या भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. नराधम वृत्ती असलेल्या लोकांकडून नरबळी वा लहान मुलांचा बळी देणे हा प्रकारसुद्धा होत असतो.

खोदकाम करणाऱ्यांचा शोध घ्या

मंदिराला कुठलेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिस (Police) प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेत या मंदिर परिसरात पोलिस गस्त वाढवावी, तसेच या पुरातन राम मंदिराच्या खाली खोदकाम करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाविक माजी सैनिक मनबहाद्दूर भंडारी, राजेश कास्त्री, गजानंद महाराज, सोमो अली, दिलीपकुमार प्रजापती, स्वरूप बोरकर आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT