Security guard killed for thirteen hundred rupees at Nagpur 
नागपूर

तेराशे रुपयांसाठी फिरल डोक अन्‌ हाती लागली चौकीदाराची काठी, मग... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकाने काही दिवसांपूर्वी मोठ्या शिताफीतीने रेल्वेतून काही चादरी चोरल्या. आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यानी त्या चादरी चौकीदार असलेल्या इसमाला विकायला दिल्या. काही दिवसांनी त्याने विकलेल्या चादरीचे पैस मागितले. मात्र, चौकीदार पैसे देत नव्हता. सतत तगादा लावत असल्यामुळे त्याने पन्नास रुपये दिले. यामुळे चिडलेल्या पंकज किशोर मोरे (31, रा. अबुमियानगर, पारडी) याने चौकीदाराचा खून केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी पंकज मोरे याने रेल्वेतून काही चादरी चोरल्या होत्या. चादरी विकण्यासाठी त्याने डिप्टी सिग्नल येथील एमजी स्टील कंपनीत चौकीदारी करणाऱ्या नामदेव बावणे यास दिल्या होत्या. परंतु, नामदेवने पंकजला पैसे दिले नाही. चादरी विकल्या नाहीत, असे नामदेवने पंकजला म्हटले होते. मात्र, पंकज पैशासाठी अडून होता. त्यावर नामदेवने त्याला 50 रुपये दिले. यावर पंकजचे समाधान झाले नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. 

वादावादीत नामदेवने काठीने पंकजला मारले. संतापलेल्या पंकजने नामदेवच्या हातातील काठी हिसकावून त्याच्या डोक्‍यावर वार केला. एकाच वारात नामदेव खुर्चीत कोसळला. त्यानंतर पंकज आपल्या साथीदारासह घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. या हत्याकांडातील आरोपीला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

असा गवसला आरोपी

नंदनवन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनात पीआय निरीक्षक भोळे, सहायक निरीक्षक माने, उपनिरीक्षक भवाळ, सहायक फौजदार स्नेहलता जायभाये, शिपाई अमोल जासूद हे पॅट्रोलिंग करीत उदयनगर चौकात गेले. त्यावेळी उदय लॉनच्या बाजूला पंकज उभा होता. पोलिसांचे वाहन पाहून पंकज पळण्याच्या तयारीत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता 2017 मध्ये त्याच्याविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात 324 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. त्याची सखोल चौकशी केली असता दोन दिवसांपूर्वी त्याने कळमना हद्दीत काकाजीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT