Service salary to be paid to nursing trainees 
नागपूर

परिचर्या प्रशिक्षणार्थींना द्यावे सेवा वेतन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आम्ही सारे परिचर्या महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी. आम्हाला कोरोना कोरोनाबाधितांच्या रुग्णसेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. आम्ही आदेशाचे पालन करत आहोत. परंतु आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा विचार करण्यात आला नाही. सेवा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अर्थात प्रशिक्षणार्थींना विमा कवच लागू करण्यात यावे. तसेच परिचर्या प्रशिक्षणार्थींना सेवा वेतन देण्यात यावे या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर या मागण्यांचे निवेदन आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. याशिवाय जिल्हाधिकारी यांनाही दिले आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा

 शासकीय परिचारिका महाविद्यालय तसेच नागपूर शहरातील खासगी परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीनी कोरोना वॉर्डात सेवा देताना काही मागण्यांचा पाठपुरावा केला. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी (ता. २१) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात परिचर्या प्रशिक्षणार्थीनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हा प्रशासनातर्फे परिचर्या प्रशिक्षणार्थींना सेवेत रुजू होण्यासाठी ३ स्मरणपत्र देण्यात आले. या स्मरणपत्रात वारंवार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. महाविद्यालयातर्फे शैक्षणिक नुकसानाची भीती दाखविल्या जात आहे. या प्रशिक्षणार्थींची सुरक्षीतता लक्षात घेता काही प्राथमिक मागण्यांना घेऊन अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु दखल घेण्यात आली नाही.

२४ दिवस लोटून गेले...
परिचर्या प्रशिक्षणार्थींना सेवेदरम्यान सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी चोवीस दिवसांपुर्वी निवेदन दिले होते. परंतु यानंतरही सुरक्षेची कुठलीही काळजी प्रशासनातर्फे घेतल्या जात नाही. जिल्हाधिकारी यांनी १० सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनावरून मौखिक आश्वासन दिले. त्यामुळे परिचर्या प्रशिक्षणार्थीं सेवेकरिता रुजू झाले. सेवेला आज ११ दिवस पूर्ण झाले, तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुठल्याही बाबींवर विचार करण्यात आला नाही.यामुळेच संविधान चौक येथे निदेर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे नागपूर महानगर सहमंत्री समर्थ रागीट यांच्यासह करण खंडाळे, ईश्वर रेवणशेटे, शंतनू झाडे, प्रियंका वैद्य, अंजली बावनकर, धनश्री कावरे, यश घुपे आदींसह परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संघटनेमार्फत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महापौर संदीप जोशी यांनाही निवेदन देऊन आपल्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले.

अशा आहेत मागण्या
-सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विमा कवच लागू करावे
-परिचर्या प्रशिक्षणार्थींना सेवा वेतन देण्यात यावे
-कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्यांना प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत प्राधान्य द्यावे.
-सेवा देणाऱ्या परिचर्या प्रशिक्षणार्थींची भोजनाची सोय करावी.
-परिचर्या प्रशिक्षणार्थीं संक्रमित झाल्यास विद्यार्थ्यांची परीक्षेची योजना असावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT