Pollution Health Crisis | Heart An Diabetes Risk sakal
नागपूर

Pollution Health Crisis: प्रदूषणामुळे हृदयविकारासह मधुमेह आजाराची मोठी जोखीम; ज्येष्ठ श्‍वसनरोग तज्ज्ञ्यांचे मत

Impact of Pollution on Heart and Diabetes Risk: प्रदूषणामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढत असून ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ्यांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

How Pollution Causes Cardiovascular and Diabetic Diseases: चाळीस वर्षांपूर्वी कुपोषण ही मोठी समस्या होती. आता लठ्ठपणा हा मोठा शत्रू आहे. सोबतच प्रदूषणामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोगासारखे आजारही होत आहेत, अशी माहिती प्युअर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप साळवी यांनी रविवारी येथे दिली.

निमित्त होते, असोसिएशन ऑफ मेडिकल सायंसेसच्या नव्या कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्याचे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्या उपस्थितीत अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नैनेश पटेल, सचिव डॉ. समीर जहांगिरदार यांच्यासह कार्यकारिणीचे पदग्रहण झाले.

श्वास घेता त्या हवेचा आरोग्यावर होणारा परिणाम हा विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. साळवी म्हणाले, निसर्गाकडून फुकटात मिळणाऱ्या प्राणवायुची किमंत उरली नाही. कोरोना काळात प्राणवायूसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आपल्याला शहाणपण सुचले नाही.

जगाच्या पाठीवरील प्रत्येकाला जगण्यासाठी किमान १ हजार लिटर प्राणवायू लागतो.

याचा सरासरी खर्च काढला तर प्रत्येक माणसाला दररोज ३० ते ३५ हजार रुपये खर्च करावे लागतील. १ लिटर इंधन जाळले तर १७०० लिटर प्राणवायू खर्च होतो. आपल्या रक्तात २५ ट्रिलियन तांबड्या पेशी आहेत. या पेशींमधून अवयवांना पोचविला जाणारा प्राणवायू शरीर जीवंत ठेवतात. दुसरीकडे ३० टक्के प्राणवायू झाडांमधून तर ७० टक्के प्राणवायू जलस्त्रोतातून मिळतो.

प्राणवायूचा हा प्राणच प्रदुषित होत आहे, असेही डॉ.साळवी यांनी नमूद केले. डॉ. सुशांत इखार यांनी फुफ्फुसांचा कर्करोग: निदान आणि व्यवस्थापन याविषयावर, डॉ. विवेक गुप्ता यांनी सीओपीडी व्यवस्थापनातील नवीन उपचारपद्धती तर डॉ. आकाश बल्की यांनी दमा व्यवस्थापनावर चर्चा केली.

युरोपीयन देशांच्‍या तुलनेत अवयवदानात भारत मागे

युरोपीयन देशांत अवयवदानाचा दर १० लाखांत ४० असा आहे, असे नमूद करीत अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे सचिव डॉ. समिर जहागिरदार म्हणाले, आपल्याकडे हाच दर०.०१ टक्का देखील नाही. भारताला दरवर्षी ३० हजार यकृत लागतात. त्या तुलनेत जेमतेम १५०० यकृतांचे दान होते. देशाला दरवर्षी १५ ते २५ लाख लाख नेत्र लागतात, त्यापैकी ६८ हजार नेत्रदान उपलब्ध होतात. किडनीच्या बाबतीत ही गरज अडिच लाख आहे. मात्र उपलब्ध होतात, केवळ ७ हजार. हृदयाची गरज ५० हजार असतानाही केवळ १५ हृदय दान होतात. ही तफावत पाहिली तर अवयवदानात भारत सर्वात मागे असल्याचे दिसते.

श्वसनसंस्था निकामी होऊन दगावणाऱ्या ६० टक्के लोकांमध्ये जुने आजार, जंतूसंसर्ग मोठे कारण असते. त्यामुळे श्वसन संस्था निकामी होऊन दगावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. नव्या तंत्रातील नॉन इन्व्हेंसिव्ह व्हेंटिलेटर तंत्रामुळे श्वसन संस्था निकामी होऊन दगावणाऱ्यांना आवर घालता येतो. दमा विकारात श्वसनलिका अकुंचन पावते. त्यामुळे कार्बनडायऑक्साईड बाहेर पडण्यास अडथळा येऊन श्वसनक्रिया बंद पडते. श्वसन विकार असलेले १० पैकी ४ जणच यापूर्वी वाचू शकत होते. मात्र एनआयव्ही अर्थात नॉन इन्व्हेंसिव्ह या नव्या तंत्रामुळे श्वसनमार्गातला हा अडथळा रुग्णाला बेशुद्ध न करता दूर करता येतो. १० पैकी ९ जणांचे प्राण वाचविता येतात.

- डॉ. नैनेश पटेल, नवनियुक्त अध्यक्ष- अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT