dr. namrta sing  
नागपूर

कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी ती निघाली आहे मोटरसायकलवरून जगभ्रमंतीला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कर्करोगाविषयी जनजागृती करीत मोटरसायकलवरून जगभ्रमंती करणाऱ्या डॉ. नम्रता सिंग यांच्या जगभ्रमंतीला "कोरोना' मुळे ब्रेक लागला आहे. भिलाई छत्तीसगढ येथील फिजीओथेरिपीस्ट डॉ. नम्रता सिंग यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी 50 हजार किलोमीटरच्या जगभ्रमंतीला आपल्या गावातून सुरूवात केली होती. आता त्यांच्या या प्रवासाला तब्बल 200 दिवस पूर्ण झाले असून, 21 हजार किलोमीटरची भ्रमंती त्यांनी पूर्ण केली आहे. यादरम्यान, डॉ. नम्रता यांनी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, हिमाचलप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगढ, तेलंगणा आणि आंध्रपद्रेश ही राज्ये पिंजुन काढली. प्रत्येक शहरात त्यांनी स्तन कॅन्सर आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत विविध सेमिनार आणि व्याख्याने घेऊन जनजागृती केली आहे.

डॉ. नम्रता यांची मावशी आणि त्यापाठोपाठ वडील या दोघांचाही कॅन्सरने मृत्यू झाला. या धक्‍क्‍यातून सावरतांना डॉ. नम्रता यांनी मनोमन या आजाराबाबत जगभ्रमंती करून जनजागृती करण्याचा ठाम निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली व पैसे जमा केले. जेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे जमा झाले तेव्हा त्यांनी मोटरसायकलवर जगभ्रमंती करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला अनेक अडचणी आल्यात परंतु, त्यावर कशा पद्धतीने मात करावी याचा आता सराव झाल्याने, अवघड वाटत नाही. संपुर्ण यात्रा मी एकटीच करत असून, बायकर्स टिममध्ये माझे लाईव्ह लोकेशन ट्रॅप होत असल्याने, मी स्वतःला संपूर्णपणे सुरक्षित समजत असल्याचे त्यांनी सांगितले.

जनजागृती होणे गरजेचे

जगभरात, स्रियामंध्ये स्तनकॅन्सरचे प्रमाण वाढत असून, 100 पैकी 25 टक्के स्रिया भारतातील असल्याने, भारतात या आजाराची जनजागृती होणे गरजेचे आहे. आजार प्राथमिक अवस्थेतच लक्षात आल्यास आटोक्‍यात येऊ शकतो. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग यावर मी जनजागृती करून, स्रियांना सजग करण्याचे कार्य स्वखर्चाने करीत असल्याचे डॉ. नम्रता यांनी सांगितले. त्या गुरूवारी रात्री नागपूरात दाखल झाल्या आणि शुक्रवारी त्यांनी आपल्या गावी भिलाईकडे प्रस्थान केले. कोरोनामुळे जगभ्रमंतीला 15 दिवस विराम देऊन, पुन्हा वातावरण पुर्ववत झाल्यावर उर्वरीत जगभ्रमंती पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT