नागपूर

शिवभोजनातून गरिबांच्या आरोग्याशी खेळ; वाचा संपूर्ण प्रकार

मंगेश गोमासे

नागपूर : गरिबांना अन्न मिळावे यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. योजनेत गरिबांना ‘सिल्व्हर फॉईल’च्या पॅकिंग स्वरूपात अन्नाचे वाटप करायचे आहे. मात्र, शहरातील काही शिवभोजन केंद्रावर प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ते देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोरोना काळात गरिबांना मोफत जेवणाची सोय करून देण्याच्या उद्देशाने राज्यात शिवभोजन केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार बचतगटांचे अर्ज मागवून त्यांना केंद्राचे वाटप करण्याचा मानस होता. मात्र, त्याचा फायदा बचतगटांना सोडून इतर राजकीय वरदहस्‍त असलेल्यांनाच अधिक झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर गरिबांना योग्यप्रकारे जेवण मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, शहरातील अनेक बचतगटांकडून त्याला तिलांजली देण्यात येत आहे.

नियमानुसार शिवभोजन देताना ते व्यवस्थितरीत्या ‘सिल्व्हर फॉईल’च्या पॅकिंग स्वरूपात अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे बहुतांश केंद्रांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्याऐवजी हलक्या प्रतीच्या व प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये देण्यात येत आहेत. त्यामुळे गरिबांच्या आरोग्याशी केंद्रावर खेळ केला जात असल्याची भावना आता व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार

गोळीबार चौकातील एका शिवभोजन केंद्रावर अशाच प्रकारे शिवभोजन प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये देण्यात आल्याने या विरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रत्नमाला मेश्राम यांच्याद्वारे तक्रार करण्यात आली आहे. यावेळी तक्रारीमध्ये येथील कामावरही शंका उपस्थित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT