shopkeeper took loan from Moneylender and received life threats  
नागपूर

पैशांची गरज होती म्हणून सावकाराकडून घेतले कर्ज.. पण काही दिवसांनी आली भयंकर धमकी.. काय आहे प्रकार 

योगेश बरवड

नागपूर : सावकारकडून कर्ज घेणे शहरातील किराणा व्यवसाईकाला चांगलेच महागीत पडले. सावकाराच्या साथीदारांनी धमकावत घेतलेल्या कर्जापेक्षा अधिकचा परतावा बळजबरीने वसूल केला. यानंतरही सावकाराचा ससेमीरा कायमच आहे. त्याच्या साथीदाराने अधिकच्या परतफेडीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकाराने घाबरलेल्या व्यवसाईकाने अखेर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सावकार पिता-पुत्र व साथीदार अशा तिघांविरुद्ध खंडणीखोरीसह, महाराष्ट्र अधिनीयमान्वये गुन्हा नोंदिवला आहे.

संजय रामुजी फातोडे (४६), रजत संजय फातोडे (२२), प्रफुल्ल ऊर्फ दादू गायकवाड (२२) अशी आरोपींची नावे आहेत. रामनगर येथील रहिवासी सागर देशमुख (२१) असे तक्रारदाराचे नाव असून त्याचे किराणा मालाचे दुकान आहे. आरोपी फातोडे पिता-पुत्राचा कंस्ट्रक्शन व डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. त्यांचे पांढराबोडी पोलित चौकीच्या मागील भागात संजय कंस्ट्रक्शन बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. याच कार्यालयातून ते सावकारीचाही व्यावसाय करीत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. 

दादू हा वसुलीची कामे पाहतो. सागरला दुकानासाठी पैशांची गरज होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याने फातोडेकडून १५ हजार रुपये घेतले. त्याच्या आर्थीक अडचणींचा फायदा घेत अवास्तव बेकायदेशीर व्याज दराने पैसे दिले. शिवाय कोऱ्या पेपरवर सही, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व दोन फोटो घेवून पावती बुकवर स्वाक्षरी घेतली. त्यानंतीर वेळोळेळी धमकावून २० हजार रुपये बळजबरीने वसूल केले. 

यानंरही दादू हा त्याच्या अन्य एका मित्रासह येऊन वसुलीसाठी वारंवार शिवीगाळकरून जिवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. या प्रकाराला कंटाळून अखेर सागरने तक्रार दिली. 

संपादन - अथर्व  महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT