Shortage of staff, workers to start the Industry 
नागपूर

उद्योगांची चाके रुतलेलीच, ही आहेत कारणे... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  :  कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग रुळावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्‍न असताना आता कर्मचारी, कामगारांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील साडेआठशे कारखानदार पुन्हा उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. यातील 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कारखान्यांना सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. कारखाने सुरू करण्यासाठी 25 हजार कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, केवळ पाच ते सातच कामगार, कर्मचारी उपलब्ध असल्याने उद्योजकांची कोंडी झाली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्‍वर, उमरेड, नागभीड औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी हालचाली सुरू असताना कोरोनाचे संकट उभे राहिल्याने आहे त्या उद्योगांनाही खीळ बसली. तिसरा लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगाची चाके पुन्हा गतिमान व्हावी, यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरील अडचणी थांबलेल्या नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरून येणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा विस्कळीत झाला. दुसरीकडे परप्रांतीयांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने गाव जवळ केले. त्यामुळे परवानगी मिळूनही उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत.  
नागपूर जिल्ह्यातील 850 पेक्षा अधिक औद्योगिक संस्था पुन्हा आपले युनिट सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी या संस्थांनी उद्योग विभागाकडे अर्ज केले. यातील 90 टक्के उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. या संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी हजारो कुशल व अकुशल कामगार, कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 50 टक्के कर्मचारी उपलब्ध झाल्याने उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास अडचणी येत आहेत. 
 

कामगार  महत्त्वाची साखळी
उद्योग सुरू करण्यासाठी कुशल व अकुशल कामगार उद्योगातील महत्त्वाची साखळी आहे. त्यातील एकही साखळी विस्कळली तरीही उद्योगाची चाके फिरणे कठीण होते. तशीच स्थिती हिंगणा, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत झालेली आहे. 
मिलिंद कानडे, अध्यक्ष, भाजप उद्योग आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT