railway
railway 
नागपूर

उत्साही डोळे आणि आनंदाने हलणा-या हातांसह श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउनमुळे नागपूर जिल्ह्यासह लगतच्या भागांमध्ये अडकून पडलेल्या तसेच निवारागृहात असलेल्या 1 हजार 600 कष्टकऱ्यांना घेऊन नागपूर-दरभंगा श्रमिक स्पेशल ट्रेन सोमवारी दुपारी 3.30 वाजता रवाना झाली. स्वगृही परतण्याचा मार्ग सुखकर झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज तिवारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, स्टेशन डायरेक्‍टर दिनेश नागदेवे, उपविभागीय महसूल अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार सूर्यकांत पाटील, राहुल सारंग आदी अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत मजुरांना निरोप दिला.
जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून चोख व्यवस्था करण्यात आली होती. मजुरांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधला असल्याची खात्री करून घेण्यात आली. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत फूड पॅकेट ही देण्यात आले.

सविस्तर वाचा - शू...आमच्या गावात तुम्हाला प्रवेश नाही बरं का!
वाहनांची व्यवस्था
नागपूर स्टेशनवरून रवाना झालेल्या श्रमिक स्पेशल रेल्वेतून भंडारा येथील 78, गोंदिया 2, गडचिरोली 105, चंद्रपूर 261, काटोल 3, कळमेश्वर 81, नागपूर ग्रामीण 183 व नागपूर शहरात अडकून असलेले 887 असे एकूण 1 हजार 600 प्रवाशांनी गावाकडची वाट धरली. या प्रवाशांना वेगवेगळ्या वाहनांमधून नागपूर रेल्वेस्टेशनपर्यत सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT