केळवद : मध्य प्रदेशाकडे परतीच्या प्रवासाला मजल दरमजल करीत पायी निघालेले नागपुरात कामावर असलेले मजूर. 
नागपूर

साहाब, ये कौनसी बिमारी है, आदमी की आदमीसे दूरी है!

अशोक डाहाके

केळवद (जि.नागपूर) :  कोरोना या ससंर्गजन्य आजाराने सर्वत्र शिरकाव केल्याने माणूसच माणसाचा वैरी झाल्याचे पहावयास मिळत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणीही कुणाची मदत करायला तयार नाही. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील कामगारांना नागपूर येथून छिंदवाडा हा120 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे. या स्थितीत या कामगारांना मदतीचा हात द्यायला कोणी समोर येत नसल्याने कोरोनाच्या दहशतीत माणुसकी लुप्त झाल्याचा प्रत्यय येत आहे.

मजूरांना हाकलून ठेकेदारच पळाले
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना याचा जबर फटका बसला आहे. विशेषत: मध्य प्रदेशातील लगतच्या छिंदवाडा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात कामगार कामावरती आहेत. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यवसायाशी जुळलेल्या सर्वच कामात हे मजूर काम करण्यासाठी शहरात दाखल झाले होते. मात्र, कोरोनासारख्या भयानक आजाराने सर्वत्र हाहाकार उडाला. या मजुरांना आज कामावरचे ठेकेदारसुद्धा बेवारस सोडून पळून गेल्याने कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायी जावे लागत आहे. यात बहुतांश तरुण असले तरी वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय असल्याने हे कामगार नागपूर येथून थेट छिंदवाड्याला पायी निघाले. वाटेत न मिळणारे जेवण तसेच रस्त्याने जाणारे कोणतेही साधन यांना बसवायला तयार नसल्याने नाइलाजाने त्यांना पायदळ चालावे लागत आहे. वाटेत कुठे एखादे दुकान खुले दिसले तेथे बिस्कीट अथवा वेपर्स पाकीटवर ते भूक मिटवत आहेत.

तिस कामगारांचा जत्था निघाला गावाकडे
या भयानक स्थितीत कोणीही यांच्या मदतीला येत नाही. काल रात्री दहाच्या सुमारास (कापशी) नागपूर येथून पायी आलेले वीस ते पंचवीस मजूर केळवदच्या बसस्थानकावर विसावा घेत होते. आज सकाळपासून मजुरांचे जथ्थे पायी केळवद येथून छिंदवाड्याच्या दिशेने स्थलांतरण करीत होते. अशात नागपूर येथून पायी आलेल्या मजुरांनी तर "साहब यह कौनसी बिमारी है, जो जिंदा आदमी को जिंदा आदमी से दूर ले जा रही है. ऐसी बिमारी कभी धरतीपे न आये, असे खिन्न अवस्थेत सांगत पुढील प्रवासाची वाट धरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT