Skills mastered in bright painting prajwal tiwaskar story 
नागपूर

Video : प्रज्वल जपतोय चित्रकलेचे ‘वैभव’; स्केच, लँडस्केप, पोर्टेट, थर्माकॉल वर्क करतात आकर्षित

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वानाडोंगरीच्या वैभवनगर येथील सुनील तिवस्कर आणि सविता तिवस्कर यांचा २१ वर्षीय मुलगा प्रज्वलने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल, इंजिनीअरिंग सारख्या क्षेत्राकडे न वळता आपली वेगळी आणि नावीन्यपूर्ण वाट निवडली आहे. चित्रकला विषयात लहानपणापासून आवड असलेल्या प्रज्वलने याच कलेतील कौशल्य आत्मसात करणे सध्या सुरू केले आहे.

प्रज्वलने रेखाटलेले स्केच, लँडस्केप, पोर्टेट, थर्माकॉल वर्क आणि वॉल डिझायनिंग सध्या अनेकांना आकर्षित करीत आहे. अभ्यासात हुशार आणि कुटुंबामध्ये मोठा असलेला प्रज्वल लहानपणापासूनच रंगाच्या आणि चित्राच्या दुनियेत रमून जायचा. जसजसा प्रज्वल मोठा होत गेला तशीतशी प्रज्वलची चित्रकलेतील आवड वाढतच गेली. त्यानंतर कुटुंबाच्या प्रोत्साहनाने प्रज्वलच्या अंगी असलेली कला हळुहळू खुलत गेली. आज त्याच्या चित्राची जादू अनेकांच्या मनात घर करून जात आहे.

बारावी विज्ञान शाखेतून ७५ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या प्रज्वलने इतर कोणत्याही क्षेत्राचा विचार न करता आपल्या आवडीच्या चित्रकलेतच शिक्षण करण्याचा निश्चय केला. त्याच्या आई-वडिलांनी सुद्धा त्याच्या या निर्णयाला भक्कम पाठिंबा दिला.

प्रज्वलचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’

बारावीनंतर थ्री डी ॲनिमेशनमध्ये डिप्लोमा केलेल्या प्रज्वलच्या ‘आर्ट’ने सगळ्यांनाच मोहित केले आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून आता प्रज्वलच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे. अवघे आकाश कवेत घेण्याची उर्मी असलेल्या प्रज्वलला आता बी.एफ.ए. करून भविष्यामध्ये मुव्ही एडिटिंग आणि चित्रकलेमध्ये करिअर करायचे आहे.

लॉकडाउनमध्ये कलेला मिळाली ‘भरारी’

मार्च अखेरीस कोरोनाने आपले पाय पसरायला सुरुवात करताच लॉकडाउन सुरू झाले. सोबत शाळा-महाविद्यालयेही बंद झालीत. प्रत्येक व्यक्ती घरात बंदिस्त झाला. आकाशने कोरोना काळातील लॉकडाउनचा सदुपयोग म्हणून कागद, पेन्सिल आणि रंगाशी मैत्री केली. आज त्याची कला चांगलीच बहरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT