small girl distribute two lakh sanitizer at Nagpur 
नागपूर

वाढदिवसाला केला चक्‍क दोन लाखांचा खर्च; तरीही कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "पप्पा माझा वाढदिवस साजरा न करता आपण त्या पैशातून सॅनिटायझर, हॅंडवॉश आणि अन्य वस्तू डॉक्‍टर्स आणि पोलिस यांच्यासह गरजूंना देऊ' असा संकल्प केवळ दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या मौली गोयल नावाच्या चिमुकलीने केला. तिच्या वडीलाने लगेच तिचा संकल्प प्रत्यक्षात उतरवित पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, आ. आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. त्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली. 

वाढदिवसाला आपल्या मित्र-मैत्रिणी आणि घरच्या मंडळींनी एकत्र येऊन केक कापावा या निमित्ताने चमचमीत गोड खाद्यपदार्थ बनावे, रिटर्न गिफ्ट द्यावे, नाच-गाणे, खूप धमाल करावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, या सगळ्या उत्सवपूर्ण आकर्षक गोष्टी नाकारून सध्यस्थितीचे कोविड-19 प्रादुर्भावाचे भान ठेवून मौली महेशकुमार गोयल हिने 20 एप्रिलला आपला आठवा वाढदिवस साजरा न त्या पैशात कोरोना विषाणूशी लढणाऱ्या अत्यावश्‍यक सेवेतील योद्ध्‌यांना सुमारे दोन लाख रुपयांचे हॅंडवॉश आणि सॅनिटायझर वितरीत करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात केली. 

या सर्व मान्यवरांनी चिमुकल्या मोलीच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. कोरोना सारख्या अज्ञात शत्रूशी लढताना मोली सारखे सामाजिक जाणीवा असलेले असंख्य नागरिक, सेवाभावी संस्था हिरीरीने सहभागी होत आहेत ही निश्‍चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

निर्णयाचे कौतुक

मौली गोयल हिने वडीलासोबत जाऊन दोन लाख रुपयांचे सॅनिटायझर, हॅंडवॉश वितरित करण्यास सुरुवात केली. त्या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऐवढ्या लहान वयात असा निर्णय तिने कसा घेतला असावा अशी चर्चा यानिमित्त रंगली होती. 

कोरोनाचा धोका वाढतोय

नागपूर शहरात कोरोनाचा धोका वाढतच आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आतातर शंभरी पार करायला केवळ चार रुग्णांची भर बाकी आहे. यामुळे प्रशासनासह पोलिसांची चिंता वाढली आहे. मात्र, नागरिक काही केल्या सुदरायला तयार नसल्याचे एकंदरीत स्थितीवरून दिसून येते. कोणत्याही कारणाने ते बाहेर पडण्याचाच प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT