सीताबर्डी : आगीच्या धुरात हरवलेल्या मॉलमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आलेले अग्निशमन विभागाचे जवान.  
नागपूर

नागपूरच्या मॉलमधून अचानक निघाला धूर...झाली पळापळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीताबर्डी येथील मुंजे चौक ते झाशी राणी चौकादरम्यानच्या रस्त्यावरील मॉलच्या मागील भागातील कचऱ्याला सायंकाळी अचानक आग लागली. या आगीचा संपूर्ण धूर मॉलमध्ये शिरला.

मोठ्या प्रमाणात धूर दिसल्याने मॉलमध्ये आग लागल्याचे समजून अनेकांनी धाव घेतली. या मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अग्निशमन विभागाला आग लागल्याचे कळविले.

अनेकांचा श्‍वास गुदमरला

काही क्षणातच अग्निशमन विभागाचे जवान मॉलमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम कचऱ्याला लागलेली आग विझविली. मात्र, आगीचा धूर मॉलमध्ये शिरल्याने अनेकांचा श्‍वास गुदमरला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शिवम या कपड्याच्या दुकानातील 50 कर्मचाऱ्यांना मॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर इतर दुकानातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले.

वाहतुकीची कोंडी

दरम्यान, आगीचे वृत्त परिसरात पसरल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली. मेट्रोच्या कामामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

कळमना बाजारात तणस जळाले

कळमना बाजारात शुक्रवारी सकाळी ट्रक क्रमांक एमएच 36-4165 मधील तणस जळाले. ट्रकमधील तणसने पेट घेताच परिसरातील अग्निशमन केंद्राला तत्काळ कळविण्यात आले. तोपर्यंत कळमना बाजारातील दुकानदारांनी ट्रकमध्ये पाण्याचा मारा करून आगीची तीव्रता कमी केली. त्यामुळे ट्रक बचावला. या आगीत 15 हजारांचे तणस जळाल्याचे अग्निशमन विभागाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT