Smuggling ganja through courier parcels 2 arrested with 22 kg ganja in Pratap Nagar nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime : कुरीअरच्या पार्सलमधून गांजाची तस्करी; प्रतापनगरात २२ किलो गांजासह दोघांना अटक

Nagpur latest Crime Update : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून प्रतापनगरात साडेचार लाखाचा गांजा जप्त करीत, दोन तस्करांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून प्रतापनगरात साडेचार लाखाचा गांजा जप्त करीत, दोन तस्करांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता.१२) सांयकाळी सात आणि रात्र साडे आठ वाजताच्या सुमारास केली.

करण दीपक पोथीवाल (वय ३१, रा. मानेवाडा रोड) आणि त्याचा साथीदार शाहरूख खान करीम खान (वय २९, रा. बंगालीपंजा) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगर परिसरात कुरीअर कंपनीच्या वाहनातून गांजी तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) निमित गोयल आणि साहाय्यक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज घुरडे, सहाय्यक फौजदार सिद्धार्थ पाटील, हवालदार मनोज नेवारे, शैलेश डोबाले, विवेक अडाऊ, पवन गजभिये, अंमलदार सुभाष गजभिये,

राहुल पाटील, अनुप यादव यांच्या पथकाने सापळा रचून प्रतापनगरातील जयताळा मार्गावर कुरीअर नेणाऱ्या कारला (एम.एच १२ डी.वाय ४८०५) थांबवून त्याची तपासणी केली. कारचालक हे कुरीअरच्या पार्सलमधून गांजाची तस्करी करताना आढळून आले.

त्यांच्याकडून ४ लाख ५४ हजार २०० रुपयांचा २२ किलो ७१० ग्रॅम हिरवा गांजा जप्त केला. चौकशीत अजिक्य नागदेवने (वय ३२) याच्या मदतीने गांजा आणि अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कार जप्त करू आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लकडगंजमध्ये एमडी जप्त

लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरोबा मैदान परिसरात गुन्हे शाखेचे पथकाने गस्तीवर असताना, हासीम राशीद शेख (वय २२, रा. गरोबा मैदान, माटे चौक, लकडगंज) युवक संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, गुन्हे शाखेच्या पथकाला त्याच्याकडे ५ ग्रॅम ८३० मिलीग्रॅम पावडर जप्त करण्यात आले.

तो गोलू बोरकर (रा. नंदनवन) यांच्या मदतीने त्याची खरेदी विक्री करीत असल्याची माहिती दिली. यावेळी त्याच्याकडून मोबाइल आणि रोख १ हजार १२० असा एकूण ७९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस गोलूचा शोध घेत असून हासीमला लकडगंड पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Rate Hike : चांदीला सोन्याचा भाव; गुंतवणूकदारांची ‘चांदी’, ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान तब्बल १७ हजार रुपयांची चढ-उतार

Theur Accidents : पुन्हा दोन अपघात, दोन मृत्यू! थेऊर परिसरात थरार; एका मोटारचालकावर गुन्हा, दुसऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

सोलापूरच्या ६७ वर्षीय 'सीए'ला २.२८ कोटींचा गंडा! सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटचे आमिष दाखविले, एक लाखास २५ हजाराचा परतावा लगेच दिला, नंतर...

SCROLL FOR NEXT