surya 
नागपूर

भारतात कुठे दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण? घ्या जाणून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आकाशाच्या रंगमचावर दुर्मिळ कंकणाकृती सुर्यग्रहणाची भव्य आकृती 21 जून रोजी उत्तर भारतातून पहायला मिळणार आहे. जोशींमठ येथून कंकणाकृतीची सर्वाधिक स्थिती 38 सेकंद पाहता येईल. उर्वरित स्थळी ते 24 सेकंद असेल. यानंतर तब्बल दहा वर्षानी म्हणजे 21 मे 2031 ला केरळ आणि तामिळनाडू येथून असे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.

पावसाळी वातावरण नसले तर मध्य आणि दक्षिण भारतातून ग्रहणाचा आनंद घेता येईल. अनेक वर्षानंतर मागील 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारतातून असे ग्रहण पाहण्याची संधी मिळाली होती. यावेळी उत्तर भारतातून ग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. 21 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी मध्य आफ्रिकेतून सकाळी 05.40 वा ग्रहणाची सुरुवात होईल. भारतात राजस्थान येथून सकाळी 10.15 मिनिटांनी तर शेवट संध्याकाळी 6.31 मिनिटांनी फिलिपिन्स येथे होईल. भारतातील केवळ राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड राज्यातून घरसाणा, इलेनाबाद, सिरसा, रतीया, कुरुक्षेत्र, यमुनानागर, डेहराडून, टीहरी आणि जोशींमठ येथून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. उर्वरित भागात खंडग्रास ग्रहण दिसेल, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

महाराष्ट्रातून 60 टक्केच खंडग्रास ग्रहण दिसणार
मुंबई येथे 60 टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. ग्रहणाला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. ग्रहण मध्य 11.37 मिनिटांनी तर शेवट 1.27 मिनिटांनी होईल. एकूण ग्रहणकाळ 3 तास 27 मिनिटांचा असेल. पूर्वेकडे ग्रहण रेखांशानुसार काही सेकंद उशिराने सुरू व समाप्त होईल. औरंगाबाद येथे सकाळी 10.06 मिनिटे, नागपूर येथे 10.17 मिनिटे तर गडचिरोली येथे ग्रहण सकाळी 10.19 मिनिटांनी सुरू होईल, ग्रहण समाप्ती दुपारी 1.52 मिनिटांनी होईल. ग्रहण एकूण 3 तास 33 मिनिटे राहील. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण कमी जास्त दिसले तरी ते सरासरी 60 टक्के दिसेल.

कंकणाकृती सूर्य ग्रहण का होते
जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्यांचे बिंब मोठे असते त्यामुळे तो सूर्याला झाकाळतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो तेव्हा त्याचे बिंब सूर्यापेक्षा लहान होते, त्यामुळे तो सूर्याला पूर्ण झाकोळू शकत नाही त्यामुळे सूर्याभोवती कंकणासारखी प्रकाश रिंग दिसते, यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
ग्रहण कसे पाहावे?
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आपण टीव्ही, यु ट्यूब इत्यादी माध्यमातूनच सूर्यग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा - आरशावर काळा कागद व मध्ये लहान छिद्र करून त्याची मोठी प्रतिमा भिंतीवर घ्यावी. कॅमेराला फिल्टर लावून फोटो घ्यावेत. दुर्बिण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये. साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. सूर्य ग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित काळी वेल्डिंग काच,फिल्टर किंवा सुरक्षित चष्मा वापरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT