nagpur sakal
नागपूर

सैनिक प्रशिक्षण केंद्रात सैनिकाची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येचे कारण कळले नसून सैनिकाच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

कामठी : नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील कामठी-कन्हान मार्गावरील ऑफिसर मेस परिसरात सैनिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विवेककुमार अखीलेश राय (२७) असे मृत सैनिकाचे नाव आहे.नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील ४१४ कन्टोनमेंट ऑफिसर मेस परिसरात सहा महिन्यांपूर्वी सैनिक प्रशिक्षणासाठी आलेले विवेककुमार अखिलेश राय (२७, बोरबायस, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) याने आज सकाळी सहा वाजता सुमारास ऑफिसर मेस परिसरातील कडूलिंबाच्या झाडाला नायलॉन दोराने गळफास लावल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली.

लगेच इतर सैनिकांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणला. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस ठाण्यात दिली असता दुय्यम पोलिस निरीक्षक मंगेश काळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप कुमरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नवीन कामठी पोलिस ठाण्याला अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिलीप ठोंबरे करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळले नसून सैनिकाच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली. मृत सैनिकाचे परिवारातील सदस्य आल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT