ayurved 
नागपूर

चिंता करू नका, कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या आयुर्वेदात आहेत अनेक उपचार... वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना सारखे हाहाकार माजविणारे विषाणू मानवी जीवनामध्ये येण्याची ही सुरुवात आहे. अशा विषाणूंचे आक्रमण भविष्यामध्ये होणारच आहे. हे विषाणू एखाद्या विषाणूवरच वाढू शकतात. त्यामुळे, आयुर्वेदाकडे वळण्याचा हा "टर्निंग पॉईंट' आहे, अशी भावना आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितेश खोंडे यांनी व्यक्त केली.

"दै. सकाळ'च्या "जरा तबीयत से' या संवादपर कार्यक्रमामध्ये "कोरोना सारख्या रोगांवर आयुर्वेदाद्वारे उपचार' या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, विषाणूंनी यापूर्वी देखील मानवावर आक्रमण केले आहे. मात्र, भविष्यातील धोके लक्षात घेता आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायला हवी. आज आपण छोट्या-छोट्या आजारांवर विविध प्रकारचे ऍन्टीबायोटीक्‍स घेतो. यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यासाठी बाजारामध्ये सहज उपलब्ध असणारा "गुडुचीचा काढा' फायद्याचा ठरतो. सकाळ-संध्याकाळ उपाशी पोटी दहा ते वीस मिली हा काढा घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल.

या काढ्यामध्ये पीत्त आणि वात शमनाची ताकद असल्यामुळे माणूस रोगांचा प्रतिकार करू शकतो. असाच फायदा गिलोय वटीचासुद्धा असून ती देखील बाजारात सहज मिळू शकते. गुडुची आणि गिलोय प्रमाणे मुळेठी, आवळा, सुंठ, पींपळी, मीरे, भारंगी, समीर पन्नाग रस या सारख्या आयुर्वेदातील औषधी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून श्‍वसनाचे आजार सुद्धा दूर ठेवतात.

सॅनिटायझरला आयुर्वेदातील पर्याय

  • हळद टाकून उकळलेले पाणी.
  • त्रिफळा टाकलेले पाणी हात धुण्यासाठी वापरावे.
  • कापूर जवळ बाळगल्यास विषाणूचा परिणाम होणार नाही.
  • तुरटी पाण्यामध्ये मिसळून त्याचा उपयोग निर्जंतूकीकरण करण्यासाठी होऊ शकतो.
  •  गरम पाण्यानेच आंघोळ करा व कपडेदेखील गरम पाण्याने धूवा.
  •  तूरटी टाकलेले गरम पाणी अंघोळीसाठी देखील वापरु शकतो.
  •  रिठ्याचे पाणीही अतिशय उपयुक्त ठरते.
  • फरशी सातत्याने लॉयझॉल, डेटॉलने पुसावी.

हे कराच...!

  •  आहारात मसाल्याचे प्रमाण वाढवावे.
  •  पदार्थ गरम करुनच खावे.
  •  10 ते 15 मिनिटे अनुलोम-विनुलोम प्राणायाम करावा.
  •  दीर्घ श्वास घ्यावा. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.
  •  झोपी जाताना दीर्घ श्वास घेत झोपावे.
  • रोज रात्री सात-आठ तास दीर्घ झोप घ्यावी.
  •  चहामध्ये गुडुची, सुंठ, मिरे, पिंपळी, आवळा, यष्ठीमधु, अर्जुन, दालचिनी सारखे वनस्पती टाकून तो प्यावा.

"रक्षोघ्न गण द्रव्या'ने दुर ठेवा कोरोना

कोरोना सारखे विषाणू नष्ट करण्यासाठी आयुर्वेदातील "रक्षोघ्न गण द्रव्य' अत्यंत उपयोगी आहे. कापूर, धूप याप्रमाणे ते घरामध्ये दररोज आपण जाळायला हवे. यामध्ये, अगरु, सर्जक्षार, वचा, लवण, गौसर्षप, निम्ब पत्र, घृत, कापूर, कडूलिंब, हिंगू, गुग्गल या पदार्थांचा समावेश असून बाजारातील कुठल्याही आयुर्वेदीक दुकानांमध्ये ते उपलब्ध आहेत. उदबत्ती किंवा धूप प्रमाणे त्याचे मिश्रण तयार करुन ते जाळल्याने घरातील वस्तूंवरील विषाणू पूर्णपणे मरतात. हजारो वर्षांपूर्वी साथीचे आजार पळवायला याचा उपयोग केला जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT