some people use fake number plate for vehicle in nagpur  
नागपूर

नागपुरातही बोगस नंबर प्लेट, चालान वाचविण्यासाठी शक्कल; चोरीच्या वाहनांवर बंधन आणणार कसे?

अनिल कांबळे

नागपूर : मुंबईपाठोपाठ आता नागपुरातही बनावट नंबर प्लेट लावून गुन्हे करणाऱ्याची संख्या वाढू लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक पोलिसांना हेल्मेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासून दंड आकारण्याबरोबरच आता बनावट नंबर प्लेट लावून गुन्हेगारी करणाऱ्यांवरही करडी नजर ठेवावी लागणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबर प्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहे. चोरटे वाहन चोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनाचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांद्वारे माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्री करतात. ती चोरीची वाहने शहरात बिनधास्त धावतात. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची संख्या अधिक आहे. विशेषतः पल्सर दुचाकींच्या चोरीमध्ये वाढ झाली असून याचा वापर सोनसाखळी चोर आणि लूटमार करणारे आरोपी करतात. गेल्या काही दिवसांत वाहनांवरील बनावट क्रमांकाच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे आल्या असल्याची माहिती आहे. 

मूळ मालक त्रस्त - 
नियम तोडल्यावर पोलिसांनी वाहनाचा फोटो काढला तरी दंडाची पावती मूळ वाहन क्रमांकाच्या मालकाच्या घरी पोहोचत आहे. त्यामुळे बनावट क्रमांकांच्या वाहनांचे फावत आहे. मूळ मालक दंडाची पावती घेऊन वाहतूक शाखेत येतात आणि ते वाहन आपले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आणतात. पोलिस पडताळणी करून चालान रद्द करतात. 

चालान वाचविण्यासाठी शक्कल -
शहरात सीसीटीव्हीमुळे थेट ऑनलाइन फोटो काढून चालान पाठविण्यात येत आहे. त्यामुळे काहींनी वाहनांवरील क्रमांकात खोडतोड केली तर काहींनी चक्क नंबरच बोगस टाकला आहे. परिणामी ऑनलाइन चालान तयार झाले तरीही कोणताच भूर्दंड बसत नाही. 

फायनान्स कंपनीची भीती -
अनेकजण फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून वाहने घेतात. मात्र, कर्जाचे हप्ते रखडले तर फायनान्स कंपन्या वाहन उचलून नेतात. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी किंवा कंपनीला गोंधळात टाकण्यासाठी अशी क्लृप्ती वापरल्या जाते. 

वाहतूक पोलिसांकडील ई चालान मशिनवर अशा क्रमांकांची माहिती अपडेट केली असून बनावट नंबरप्लेट लावलेल्या बऱ्याच वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. बोगस नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर आता वाहतूक शाखेचा 'वॉच' आहे. 
-सारंग आवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT