Someone threw stones at the construction of the Buddhist Study Center 
नागपूर

बौद्ध अध्ययन केंद्राच्या बांधकामात टाकला कुणी खोडा...वाचा नेमके काय झाले

मंगेश गोमासे

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रात विपश्‍यना व ध्यानसाधना सभागृह करण्याचे ठरविले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विद्यापीठाने 50 लाख रुपये जमा केले. मात्र, आता विद्यापीठाने जमा केलेले 50 लाख रुपये परत मागविले आहे.विद्यापीठ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी खोडा घातल्याने हे काम रखडले आहे. यामुळे शहराच्या मध्यभागी तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विपश्‍यना केंद्राचेही काम थांबले आहे.

विद्यापीठाने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या बांधकामाला अडीच वर्ष पूर्ण झाले. विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालय परिसराच्या बाजूला उभारलेली ही वास्तू आहे. सध्यास्थितीत या दुमजली इमारतीत तळमजल्यावर केंद्र संचालकांचा कक्ष, प्राध्यापकांचे दोन कक्ष, ग्रंथालय, वाचनकक्ष, दोन संगणककक्ष, चार वर्ग खोल्या, एक कार्यालय व एक महिला कक्ष आहेत. 5 कोटी 47 लाख एवढा खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे.

मात्र, महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारत बांधकामात काही त्रुटी काढल्याने उद्‌घाटन होऊ शकले नाही. या केंद्राच्या दुसऱ्या माळ्यावर बांधकाम करण्यासाठी 2017-18 आणि 2018-19 या वर्षांच्या विद्यापीठ अर्थसंकल्पात तरतूद करून विपश्‍यना व ध्यानसाधना सभागृहाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागात जमा करण्यात आले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा केलेली रक्कम विद्यापीठाद्वारे परत घेण्यात आलेली आहे. या प्रकाराने अध्ययन केंद्र आणि विपश्‍यना केंद्राचेही काम थांबले आहे.


विपश्‍यना सभागृहाचा अनेक नागरिकांना लाभ होणार या उद्देशाने हा प्रकल्प होता. मात्र, विद्यापीठातील काही अधिकाजयांनी पीडब्लूडीकडून हे पैसे परत घेत चांगल्या प्रकल्पामध्ये खोडा घातला आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी व्हायला हवी.
डॉ. पुरणचंद्र मेश्राम,
माजी कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT