file 
नागपूर

लाडक्‍या मुलाची तक्रार घेतली नाही, मग वडील वकिलाने केली चक्‍क ठाणेदाराविरुद्ध तक्रार...

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर): सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार दखलपात्र गुन्हा असलेल्या तक्रारीत आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेशीत केले आहे. मात्र, आजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामठीतील रहिवासी एका अभियांत्रिकीच्या तरुणावर दरोडा घालून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात तरुणाने न्यायिक मागणीसाठी आजनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात हयगय करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. या तक्रारीचा तपाससुद्धा सुरू केला नाही. यावरून तरुणाच्या वडिलांनी चक्‍क ठाणेदाराविरुद्ध तक्रार केली आहे.

हे नक्‍कीच वाचा : जीवलग दोस्ताने केले दुश्‍मनापेक्षाही भयंकर कृत्य

पोलिसांकडून टाळाटाळ
केलेल्या तक्रारीवरून पीडित अजिंक्‍य युवराज हुमने हा एक अभियांत्रिक असून वकिली शिक्षणाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. हा तरुण खासगी कामे आटोपून घराकडे जात असताना आजनी पोलिस ठाण्याच्या मागील एनआयटी गार्डनजवळ आरोपी शुभम थूल व त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी, त्याच्या हातातील दोन तोळ्याचा चांदीचा कडा व त्याच्या पॉकेटमधील दोन हजार पाचशे रुपये हिसकावून पळ काढला. यासंदर्भात पीडित तरुण अजिंक्‍य हुमने यांनी आजनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी कोरोना महामारीत पोलिस व्यस्त असल्याची बतावणी करून दुर्लक्ष करीत दुसऱ्या दिवशी बोलावले. यासंदर्भात पीडित तरुणाची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाचे वडील ऍड. युवराज हुमने यांनी खुद्द आजनी पोलिस ठाण्याला 1 जूनला तक्रार दाखल करून आरोपी शुभम थूल व त्याचे सहकारी दरोडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची आजूनपावेतो कुठलीही गंभीर दखल न घेता प्रकरणाचा तपाससुद्धा केला नाही.

हेही वाचा : चला, उठा, गडयांनो, पुन्हा पेरूया हिरवी स्वप्ने !

सीसीटीव्ही फुटेजसुद्धा गोळा केले नाही
तक्रारीत नमूद असलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा गोळा केले नाही, तसेच फिर्यादीची एमएलसीसुद्धा केली नसल्याने फिर्यादीला नाइलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. तेव्हा कर्तव्यात कसूर करून हयगय करणाऱ्या तसेच आरोपींना साथ देणाऱ्या पोलिस निरीक्षक खांडेकर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करावे, अशी मागणी रिपब्लिकन बेरोजगार विद्यार्थी संघटनेच्या वतीने ऍड. युवराज हुमने यांनी शासनाकडे तक्रारस्वरूपात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT