soybean damaged in irrigation sectors shows zero in government report 
नागपूर

सिंचनाच्या क्षेत्रात होत नाही सोयाबीनचे उत्पादन, प्रशासनाचा जावईशोध

नीलेश डोये

नागपूर : राज्यात सिंचन क्षेत्रात वाढ करण्याचा दावा शासनाकडून करण्यात येतो. सिंचनाची सोय असल्याची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारावर आहे. सिंचनाच्या सोयीमुळे शेतकरी दुबार, तिबार पीक घेतात. परंतु, प्रशासनाच्या दरबारी जिल्ह्यात सिंचनाची सोयच नसल्याचे दिसते. वाचून आश्चर्य वाटेल; परंतु हे खरे आहे. प्रशासनाकडून सोयाबीन नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला. यात फक्त कोरडवाहू क्षेत्राचाच उल्लेख असून सिंचनाखालील क्षेत्रातील नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. प्रशासनाने जिल्ह्यात सिंचित क्षेत्रात सोयाबीन होत नसल्याचा शोध लावल्याचा दिसते. 

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान झालेली अतिवृष्टी, पूर, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण पीक हातचे गेले. प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. ९१५१३ शेतकरी बाधित झाले. प्रशासनाच्या सर्व्हेनुसार १३ ही तालुक्यात संपूर्ण क्षेत्रामध्येच नुकसान आहे. नुकसानाच्या मदतीसाठी ४६,८९,८४,१०० रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. हे नुकसान फक्त कोरडवाहू क्षेत्रातच दाखविण्यात आले आहे. सिंचित क्षेत्रातील नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात सिंचनाची सोय अनेक शेतकऱ्यांकडे आहे. त्याचा उपयोगही त्यांच्याकडून होतो. परंतु, प्रशासनाच्या सर्व्हेत सिंचित क्षेत्रात शून्य नुकसान दाखविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT