नागपूर

पेरणीचा सोयाबीन ११५ रुपये किलोंवर; आर्थिक गणितच कोलमडले

चंद्रशेखर महाजन

नागपूर : मागच्या वर्षी ७५ ते ८२ रुपये किलोने मिळणारे सोयाबीनचे (soybean) बियाणे यावर्षी चक्क ११५ रुपये किलोने मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांमध्ये मोठी भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले (The economic math of the farmers collapsed) आहे. दुसरीकडे सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याला चार ते पाच हजार भाव मिळत असल्याने पेरणी करावी किंवा नाही, या विवंचनेत शेतकरी आहे. (soybean-price-at-Rs-115-per-kg)

विदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला मान्यता मिळाली. शेतकऱ्यांनी विविध उपाय करून भरपूर उत्पादनही घेतले. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत पिकाला भाव मिळत नसल्याने काही वर्षांत हे पीक शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी अवस्था पिकाची झाली. सध्या पेरणीचा मोसम सुरू आहे. सोयाबीनचे बियाणे ११५ रुपये किलोग्रॅमप्रमाणे बाजारात मिळत आहे.

अनेक कंपन्यांचे बियाणे बाजारात विक्रीला आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी भाववाढ केली. मागील हंगामात ७२ ते ८२ रुपये किलोग्रॅमप्रमाणे बियाण्यांची विक्री झाली. ३० किलोची बॅग २ हजार ४६० रुपयांना मिळायची. ती आता ३ हजार ४५० रुपयांना मिळत आहे. जवळपास ३५ रुपये एका किलोग्रॅमवर वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे पीक घ्यायचे किंवा नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे. महत्त्वाचे म्हणजे क्विटंलवर ३ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

१६ लाख ५० क्विंटल बियाण्यांची गरज

राज्यात सर्व प्रकारच्या १६ लाख ५० हजार क्विटंल बियाण्यांची गरज असते. त्यात १५ टक्क्यांवर बियाणे हे सोयाबीनचे असते. कपाशीनंतर सर्वाधिक पसंती या पिकाला आहे. शेतकरी हे पीक नगदी पीक म्हणून बघतात हे विशेष.

सोयाबीनचा उतारा फक्त चार क्विटंलवर

शेतकऱ्यांचे हे पीक आता त्यांच्यासाठी नकोसे झाले आहे. गेल्या वर्षी फक्त हेक्टरी तीन ते चार क्विटंल उत्पादन झाले. शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका होता. शासकीय अंदाजानुसार सोयाबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी व्हायला पाहिजे. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ३.८१ क्विंटल हेक्टरी उत्पादन झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला

  • १०० ते ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा

  • पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक आणि जैविक प्रक्रिया करा

  • पेरणी टोकण किंवा रुंद वरंभा सरी पद्धतीने करा

  • वरील पद्धतीने पेरणी केल्यास एकरी पाच ते सहा किलो बियाण्यांची बचत होते

(soybean-price-at-Rs-115-per-kg)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT