Video Esakal
नागपूर

Video: ताशी 100 ते 120 चा स्पीड अन् ड्रायव्हर पाहतोय मोबाईलवर पिक्चर, समृद्धी महामार्गावरील व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अपघाताची अनेक कारणे समोर येतात. यामध्ये काही वेळा चालकांच्या चुकीमुळे अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. तर आतापर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान काल समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ जणांनी आपला जीव गमावला, ही घटना ताजी असतानाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, यामुळे अनेकांना संताप अनावर झाला आहे. एकीकडे समृद्धी महामार्गावर दररोज अपघात होत असताना दुसरीकडे नागपूर ते पुणे महामार्गावरून जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल चालकाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल ताशी 100 ते 120 च्या गतीने चालवत असताना चक्क कानात हेडफोन लावून मोबाईलवर चित्रपट बघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चालकांच्या या कृत्याने भीषण अपघाताची शक्यता आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या ट्रॅव्हल चालकाचे लायसन्स रद्द करा अशी मागणी सध्या नेटकरी करत आहेत.

समृध्दी महामार्गावर काल भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर काल भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान बालकाचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT