नागपूर

Accident News: चालकाचे नियत्रंण सुटलं अन् भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

चंद्रपूर जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

चंद्रपूर जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातामध्ये रिक्षाचालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रक ऑटोरिक्षावर उलटली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात येत होता. अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर उलटला. ट्रकखाली चिरडल्याने ऑटोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजकला मोहूर्ले, गीता शेंडे, दशरथ बोबडे अशी जखमींची नावे आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT